अन्नधान्य महागाई दर 17.56 टक्के
डाळी आणि बटाटे यांच्या सततच्या वाढत्या दरामुळे अन्नधान्य महागाई दरातही वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- डाळी आणि बटाटे यांच्या सातत्याने वाढणा-या दरांमुळे अन्नधान्य महागाई दरातही वाढ झाली आहे. २३ जानेवारीला संपलेल्या आठवड्यात हा दर 17.56 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात हा दर 17.40 टक्के इतका होता.
अन्नधान्य महागाई दराच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बटाट्याच्या दरात 44.91 टक्क्यांनी वाढ झाली असून डाळींच्या किमती 44.43 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या आठवड्यात चहाच्या किमती पाच टक्क्याने तर उडीद, फळे, भाज्या आणि अंड्यांच्या किमती एक टक्क्याने कमी झाल्या आहेत.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा