पहिले पान | अर्थजगत | मोबाइल फोन म्युझिकवर लवकरच कर?

मोबाइल फोन म्युझिकवर लवकरच कर?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मोबाइल फोन म्युझिकवर करमणूक कर लावण्याची शिफारस महसूल खात्याने राज्य सरकारकडे केल्याने कॉलर ट्युन्स किंवा गाणी डाउनलोड करण्यावर लवकरच कर बसण्याची शक्यता आहे.

पुणे- मोबाइल फोन म्युझिकवर करमणूक कर लावण्याची शिफारस महसूल खात्याने राज्य सरकारला केली असल्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी  येथे दिली. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांच्या महसूल खात्याने घेतलेल्या परिषदेमध्ये ही शिफारस करण्यात आल्याचे ते म्हणाले. यामुळे मोबाइल फोनवर कॉलर ट्युन्स, गाणी डाऊनलोड करण्यावर कर लागू शकेल.

प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना रेडी रेकनरपेक्षा 25 टक्के जास्त मोबदला जमीन मालकाला देण्याची शिफारसही या परिषदेत करण्यात आली आहे. राज्य सरकारची यंत्रणा गतीमान करण्यासाठी एकंदर 22 शिफारशी या परिषदेत करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. जातपडताळणी तसेच अधिवास प्रमाणपत्र देण्यासाठी खास कर्मचारी नेमावेत, सरकारी दप्तरातील कालबाह्य नमुने बाद करावेत, विभागीय आयुक्तांना दंडाधिका-यांचे अधिकार द्यावेत अशा अनेक शिफारशींचा यात समावेश आहे. येत्या तीन महिन्यांत या शिफारशी राज्य मंत्रिमंडळापुढे ठेवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले.

महसूल मंत्री राणे यांच्यासह महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, अप्पर मुख्य सचिव रमेश कुमार या परिषदेला उपस्थित होते.  

शिवसेनेने राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या निदर्शनांबाबत विचारले असता, शिवसेना आज शंभर कार्यकर्तेही रस्त्यावर जमवू शकलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आता दुकान बंद करावे, अशा टिप्पणी राणे यांनी केली.

   

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0