PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: गाड्यांच्या किमतीत वाढीची शक्यता गाड्यांच्या किमतीत वाढीची शक्यता ================================================================================ पीटीआय on 26 February, 2010 02:35:00 PM नवी दिल्ली- उत्पादन शुल्कातील वाढीमुळे गाड्यांच्या किमतींमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असे ऑटोमोबाईल उत्पादकांनी म्हटले आहे. उत्पादन शुल्कामधील सवलत मागे घेऊन पुन्हा ते दहा टक्के करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात झाल्यानंतरची ही त्वरीत प्रतिक्रिया असल्याचे म्हटले जात आहे. गाड्यांच्या किमतींमध्ये दोन टक्क्याने वाढ होईल, असे मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हुंडाई मोटरच्या किमतीही 6500 ते 25000 पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे समजते.