पहिले पान | अर्थजगत | भारतात गुंतवणूक करा

भारतात गुंतवणूक करा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारतातल्या पायाभूत क्षेत्रापासून ते हास्पिटॅलिटी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सौदीतील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.

रियाध- जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारतातल्या पायाभूत क्षेत्रापासून ते हास्पिटॅलिटी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सौदीतील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीमजलिस - अल- शुरामध्ये (सौदी सल्लागार परिषद) बोलताना केले.

 

पुढील 25 वर्षात देशाचा आर्थिक विकासदर 09 ते 10 टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आर्थिक विकासदर उंचावला तर देशातील लाखो नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढता येईल आणि देशाला जगातील मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न साकार करता येईल. आत्मविश्वास आणि आशावाद अशी देशाची भविष्याची वाटचाल आहे, असेही ते म्हणाले.

 

गेल्या पाच वर्षात भारताने ९ टक्के विकासदर कायम राखला असून जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणातही चालू आर्थिक वर्षामध्ये साडेसात टक्के विकासदर कायम राखला जाईल, असा आत्मविश्वास पंतप्रधांनी सौदी सल्लागार परिषदेतील मान्यवरांसमोर व्यक्त केला.

पायाभूत, निर्मिती, सेवा, हॉस्पिटॅलिटी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सौदीतील गुंतवणूकदारांना संधी असून माहिती-तंत्रज्ञान, बॅँकिंग, दूरसंचार, औषध इत्यादी विविध क्षेत्रे सौदीमध्ये खुली झालेली असल्याने भारतीय कंपन्याही या संधीचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. जवळपास 500पेक्षा संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून सौदी अरेबियामध्ये दोन अब्ज डॉलरपेक्षा जास्त भारतीय गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सौदी हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार देश असून उभय देशातील व्यापारात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य दृढ

 2006 साली राजे अब्दुल्ला यांच्या झालेल्या दिल्ली भेटीनंतर सौदी आणि भारत यांच्यातील निर्यात वाढून ती अगोदरच्या ५० कोटीवरून २३ अब्ज डॉलरवर (२००८) गेली. या निर्यातीमुळे भारताला सर्वात जास्त कच्च्या तेलाची निर्यात करणारा इराण पिछाडीवर पडला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या या तीन दिवसांच्या भेटीत सौदी अरेबियाने भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठय़ात दुपटीने वाढ करण्याचे जाहीर केले.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0