PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हवाई प्रवासावरील सेवाकर कमी होण्याचे संकेत हवाई प्रवासावरील सेवाकर कमी होण्याचे संकेत ================================================================================ पीटीआय on 04 March, 2010 01:15:00 AM नवी दिल्ली- हवाई प्रवासावरील सेवाकरात येत्या काही काळात कपात होऊ शकते, असे संकेत केंद्र सरकारने बुधवारी दिले. या संदर्भात सर्व विमान कंपन्या आणि संबंधितांशी चर्चा सुरू असून प्रवाशांवर अनावश्यक बोजा न टाकणारा सेवाकराचा दर लवकरच निश्चित केला जाईल, असे केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमाशुल्क विभागाचे अध्यक्ष व्ही. श्रीधर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 10 टक्के सेवाकर लादण्याचा प्रस्ताव मांडला होता. दुसरीकडे, देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांवर लादलेला 10 टक्के सेवाकर पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी केली.