पहिले पान | अर्थजगत | सामान्य करदात्यांनो निश्चिंत राहा

सामान्य करदात्यांनो निश्चिंत राहा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पुढच्या वर्षी म्हणजे १ एप्रिल २०११ पासून नवीन प्रत्यक्ष कर फायदा लागू होणार असल्यामुळे मधल्या एक वर्षासाठी फार मोठे बदल अपेक्षित नाहीत. त्यानुसार अगदी जुजबी स्वरूपाचे आणि तेही फार थोडे बदल यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या बाबतीत प्रस्थापित केले आहेत. सामान्य करदात्यांशी संबंधित प्रस्तावांची माहिती आज घेऊ या.

पुढच्या वर्षी म्हणजे १ एप्रिल २०११ पासून नवीन प्रत्यक्ष कर फायदा लागू होणार असल्यामुळे मधल्या एक वर्षासाठी फार मोठे बदल अपेक्षित नाहीत. त्यानुसार अगदी जुजबी स्वरूपाचे आणि तेही फार थोडे बदल यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या बाबतीत प्रस्थापित केले आहेत. सामान्य करदात्यांशी संबंधित प्रस्तावांची माहिती आज घेऊ या.

 

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात कौटिल्याच्या अर्थमीतीचा वारंवार उल्लेख केला. फुलाला त्रास न देता ज्याप्रमाणे मधमाशी मध गोळा करते किंवा भुंगा परागकण उचलतो त्याप्रमाणे प्रजेकडून कर गोळा केला जावा, असे कौटिल्याने म्हटले होते.

 

यंदा कराचे तीन दर १० टक्के, २० टक्के, ३० टक्के तेवढेच राहिले तरी स्लॅब म्हणजे पाय-या थोड्या वर नेल्या आहेत. म्हणजे सध्या पायाभूत मर्यादा करपात्र उत्पन्न १,६०,००० रु. आहे. त्या मर्यादेच्या वर करपात्र उत्पन्न असेल तरच कर लागतो. (महिलांना रु. १,९०,०००/- तर ज्येष्ठ नागरिकांना रु. २,४०,०००/-). या पायाभूत मर्यादा तेवढय़ाच ठेवल्या आहेत. मात्र पहिली पायरी ३,००,००० रु. पर्यंत व दुसरी ५०,००० रुपये व दुसरी ८,००,००० रु. अशी केली आहे. अर्थात, ,००,००० रुपयांपर्यंत १० टक्के ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत २० टक्के व त्यावर ३० टक्के या दरांमुळे रु. ८,००,००० रुपये करपात्र उत्पन्नावर सध्यापेक्षा ५०,००० रुपये एवढी भरीव बचत करामध्ये होईल. परंतु सर्वसामान्य माणूस तो  २५,००० रुपये दरमहा या उत्पन्नाच्या गटात मोडतो. म्हणजे करपात्र उत्पन्न ३००,००० रुपयाच्या आसपास असते. त्याला काहीच सूट मिळाली नाही. जी सूट मिळाली ती वरच्या उत्पन्न गटांना मिळाली. त्यामुळे लहान करदात्याची नाराजी राहील.

 

कलम-८०सीमध्ये सध्या १,००,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक किंवा खर्च वजावटीस पात्र असतात. उदा. विमा हप्ता, भविष्यनिर्वाह निधी, शिक्षणाची फी इ. आता नवीन कलम ८० सीसीएफनुसार वाढती रु. २०,०००/- वजावट पायाभूत सुविधा पुरविणा-या (इन्फ्रास्ट्रक्चर) कंपन्यांच्या बाँड्समधील गुंतवणुकीवर मिळेल. तर उल्लेखिलेल्या व्यक्तींचा जो कर वाचेल (स्लॅबमुळे) तो या बाँड्सकडे वळू शकेल.

 

आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे जुना सरल २ विवरणपत्राचा फॉर्म पुन्हा येणार आहे. सध्याचे आयटीआर १ व २ फॉर्म फारच क्लिष्ट वाटतात.

 

कलम-५६ म्हणजे अन्य स्रेतांपासून उत्पन्न यामध्ये बक्षिसाचा समावेश २००४ पासून करण्यात आला होता. तेव्हा फक्त पैशाच्या स्वरूपात (रोख/चेक) बक्षीस मिळाले आणि ही रक्कम वर्षाला  ५०,००० रुपयांच्यावर गेली तरच ती करपात्र होत होती. गेल्या वर्षी त्यांनी वस्तूच्या स्वरूपातील भेटींचाही समावेश केला. भेट मिळालेली वस्तू स्थावर असो वा जंगम. जर तिचे मूल्य  ५०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल तर ते बक्षीस करपात्र करण्याची तरतूद गेल्या वर्षी आली; पण बक्षिसाचा एक प्रकार म्हणजे बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत एखादी वस्तू विकत मिळाली तरी ती एक प्रकारची भेटच वस्तू गणली जाते. उदा. एक घर एखाद्याने  २० लाख रुपयांना खरेदी केले; पण स्टॅम्पडय़ुटीनुसार त्याचे बाजारमूल्य  २५ लाख रुपये आहे. तर  ५०,००० रुपये हेही त्याचे उत्पन्न धरण्याची तरतूद गेल्या वर्षी झाली. हे फारच जाचक होते. ही तरतूद काढून टाकण्याचे यंदा प्रस्तावित आहे. मात्र पूर्ण मालमत्ता बक्षीस मिळाली तर ही तरतूद लागू होईल. त्याचप्रमाणे कमी किमतीत घर विकले तो तर बांधकाम व्यवसायातला व्यवहार नसेल तर ज्याने विकले त्याला त्या ५ लाख रुपयांवर भांडवली नफ्याप्रमाणे कर भरावा लागेल. ही तरतूद कलम-५०सीअन्वये पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तरीही या बदलामुळे घर विकत घेणा-याला थोडी सुटका मिळू शकते.

 गंमत म्हणजे वस्तूच्या स्वरूपात सोन्याचे दागिने किंवा चांदीची भांडी वा तत्सम वस्तू मिळाली तर करपात्र होती; पण सोने बिस्किटाच्या स्वरूपात किंवा इतर मौल्यवान धातू नुसतेच मिळाले तर करपात्र नव्हते. आता ही पळवाट बुजविण्यात आली आहे. तसेच जर भेट मिळालेली वस्तू ही घेणाऱ्याच्या धंद्यातील माल असेल- (उदा. फर्निचर विकणा-याला फर्निचरच भेट मिळाले, जे त्याचे स्टॉक- इन-ट्रेड असेल तर ते करपात्र होणार नाही. इतर बदल जे प्रस्तावित आहेत, ते मुख्यत: कंपन्यांना लागू होणारे आहेत. सामान्य करदात्यांशी त्यांचा फारसा संबंध नाही. तेव्हा सामान्य करदात्याने निश्चिंत राहण्यास हरकत नाही. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0