सेन्सेक्स पुन्हा १७ हजारांवर
विदेशी निधी संस्थांनी केलेल्या तुफान खरेदीमुळे सेन्सेक्सने तब्बल सहा आठवडय़ांनंतर पुन्हा 17 हजार अंकांचे शिखर सर करत 227 अंकांच्या वाढीची नोंद केली.
मुंबई- वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पावर फिदा होऊन दलाल स्ट्रिटवर सुरू झालेला खरेदी अजूनही थांबली नाही. त्यातच बुधवारी विदेशी निधी संस्थांनी केलेल्या तुफान खरेदीमुळे सेन्सेक्सने तब्बल सहा आठवडय़ांनंतर पुन्हा 17 हजार अंकांचे शिखर सर करत 227 अंकांच्या वाढीची नोंद केली.
मुंबई शेअर बाजाराबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 71.10अंकांची वाढ होऊन तो 50008.10 अंकांच्या पातळीवर गेला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीही खरेदीचा जोर वाढविला असल्याने तेल आणि वायू, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, एफएमसीजी आणि बॅँकिंग या सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांनी भरारी घेतली.
दिवाळखोरीत गेलेली लियॉँडेलबेसल कंपनी 14.5 अब्ज डॉलरला खरेदी करण्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रस्ताव या कंपनीच्या कर्जदारांनी नाकारल्याचे वृत्त आहे. हा खरेदी व्यवहार फिसकटल्यामुळे आनंदीत झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे रिलायन्सच्या समभागांना चांगली मागणी आहे.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा