PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अन्नधान्य महागाई दर 17.87 टक्के अन्नधान्य महागाई दर 17.87 टक्के ================================================================================ पीटीआय on 04 March, 2010 02:40:00 PM नवी दिल्ली- दूध, गहू आणि भाज्या यांच्या वाढत्या किमतीमुळे अन्नधान्य महागाई दरातही वाढ झाली आहे. 20 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर 17.87 टक्के इतका नोंदवण्यात आला. त्या अगोदरच्या आठवड्यात हा दर 17.58 टक्के इतका होता. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, तांदळाचे भाव 10 टक्क्यांनी, गव्हाचे दर 14 टक्क्यांनी तर डाळींचे भाव 35 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे कांद्याच्या किमती 11 टक्क्यांनी तर बटाट्याच्या किमती 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत.