पहिले पान | अर्थजगत | महागाई हा चिंतेचा विषय- पंतप्रधान

महागाई हा चिंतेचा विषय- पंतप्रधान

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

देशात गेल्या वर्षभरापासून अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती हा अतिशय गंभीर चिंतेचा विषय असून यावर आळा घालण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली- देशात गेल्या वर्षभरापासून अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती हा अतिशय चिंतेचा विषय असून याला आळा घालण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

अपुरा मान्सून आणि जागतिक मंदी अशा दोन्ही समस्यांवर मात करून दोन आकडी विकासदर गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर 7.2 ते 7.5 टक्के राहील तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2010-11मध्ये हाच दर आठ टक्क्यांपर्यंत असेल असा विश्वास पंतप्रधान सिंग यांनी व्यक्त केला.

देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाया मजबूत असून आर्थिक परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि सामाजिक सुविधा चांगल्या प्रकारे उभ्या केल्या तर देशाचा विकासदर दोन आकड्यांवर पोहचण्यात कोणतीच आडकाठी येणार नाही असे पंतप्रधान सिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले.

 

 

 


Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0