‘बेसरेट’ पद्धत तीन महिने लांबणीवर
बॅँकांसाठी एक एप्रिलपासून लागू होणारी व्याजदर रचनेची ‘आधार दर’ अर्थात ‘बेसरेट’ पद्धत तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय रिझव्र्ह बॅँकेने घेतला आहे.
मुंबई- बॅँकांसाठी एक एप्रिलपासून लागू होणारी व्याजदर रचनेची ‘आधार दर’ अर्थात ‘बेसरेट’ पद्धत तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय रिझव्र्ह बॅँकेने घेतला आहे. त्यामुळे आता ही पद्धती एक जुलैपासून अमलात येणार असल्याचे रिझव्र्ह बॅँकेच्या डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी स्पष्ट केले.
बॅँकांच्या विविध व्याजदराची रचना असलेली सध्याची प्राधान्यकृत कर्ज दर पद्धती (पीएलआर) रद्द करून नवीन आधार दर पद्धत एक एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय रिझव्र्ह बॅँकेने आपल्या पतधोरण आढाव्यात घेतला होता. या नवीन पद्धतीमुळे बॅँक खातेदार आणि कर्जदार यांना लागू होणा-या विविध व्याजदराचे अवलोकन करता येणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे बॅँकांच्या व्याजरचनेतही अधिक पारदर्शकता येण्यास वाव आहे. मात्र एप्रिलपासून नवीन बेसरेट पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अन्य बॅँकांची तयारी पुरेशी नसल्याने यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी रिझव्र्ह बॅँकेकडे करण्यांत आली होती. या संदर्भात विविध बॅँकांचे प्रमुख आणि भारतीय रिझव्र्ह बॅँकेचे गव्हर्नर डॉ. डी. सुब्बाराव यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत ही नवी बेसरेट पद्धत एक एप्रिलऐवजी एक जुलै रोजी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा