पहिले पान | अर्थजगत | गुढीला महागाईच्या गाठी

गुढीला महागाईच्या गाठी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

तांब्याचा गडू, रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि साखरेची गाठ या सर्व जिन्नसांनी घरासमोरची गुढी सजते. पण मागील वर्षी पाच ते दहा रुपये असलेल्या गाठीची (साखरेच्या पाकाचा हार) किमत यंदा 15 ते 20 रुपयांवर गेल्यामुळे साखरेच्या हारापेक्षा फुलांचा हार परवडला असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबई- दूध, चक्का, साखर सगळेच महागल्यामुळे ऐन गुढीपाडव्याला सामान्यांवर महागाईची गुढी उभारण्याची वेळ आणली आहे. साखरेचे भाव तिपटीने वाढल्यामुळे श्रीखंड, आम्रखंड आदी तर सोडाच पण गुढीला बांधण्यात येणा-या साखरेच्या गाठीलाही महागाईचा पीळ बसला आहे.

 

तांब्याचा गडू, रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि साखरेची गाठ या सर्व जिन्नसांनी घरासमोरची गुढी सजते. पण मागील वर्षी पाच ते दहा रुपये असलेल्या गाठीची (साखरेच्या पाकाचा हार) किमत यंदा 15 ते 20 रुपयांवर गेल्यामुळे साखरेच्या हारापेक्षा फुलांचा हार परवडला असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 

लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांत सजलेल्या साखरेच्या गाठी गुढी पाडव्याच्या एक-दोन दिवस अगोदर हलवायाच्या दुकानात लटकू लागतात. मात्र, त्या होळीच्या काही दिवस अगोदरच बनवल्या जातात. त्यासाठी नगर, सातारा, कोल्हापूर येथील गाठी बनवणारे खास कारागिर बोलावले जातात. किलोमागे 45 रुपयांपर्यंत गेलेला साखरेचा भाव आणि त्यातच मजुरीचा वाढलेला खर्च यामुळे साखरेच्या गाठी यंदा महागल्या आहेत. 60 ते 70 किलोचा साखरेचा हार 150 ते 170 रुपयांवर गेला असल्याचे मिठाई व्यापारी श्रीराम कांदू म्हणाले.

 

दादर येथील श्री स्वामी समर्थ स्वीटचे कैलास पांचाळ यांनी ग्राहकच महागाईने हवालदिल झाल्यामुळे भाववाढ करायची कशी असा यक्षप्रश्न आम्हाला पडला असल्याचे प्रहारला सांगितले. कांदिवलीतील श्रीकृष्ण अ‍ॅण्ड फरसाण मार्टचे हिरालाल चौधरी यांनी गाठीचे भाव सध्या वाढलेले नसले तरी पुढील पाच ते दहा दिवसात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट केले.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0