पहिले पान | अर्थजगत | देशांतर्गत बाजारात वाहनविक्रीचा उच्चांक

देशांतर्गत बाजारात वाहनविक्रीचा उच्चांक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वाहन उद्योगाने जागतिक मंदीच्या सावटातून बाहेर आल्याचे जाहीर करत देशांतर्गत बाजारात वाहनविक्रीचा उच्चांक गाठला आहे.

नवी दिल्ली- वाहन उद्योगाने जागतिक मंदीच्या सावटातून बाहेर आल्याचे जाहीर करत देशांतर्गत बाजारात वाहनविक्रीचा उच्चांक गाठला आहे. जानेवारी महिन्यातील वाहनविक्रीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील वाहनविक्रीत घसघशीत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गेल्या वर्षी 8 लाख 37 हजार 17 गाड्या विकल्या गेल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 11 लाख 29 हजार 783 गाड्यांची विक्री झाली आहे.

 

जानेवारी महिन्यात 11 लाख 14 हजार 157 गाड्यांची विक्री झाली होती. फेब्रुवारी महिन्यात यापेक्षा अधिक विक्रीची नोंद झाली असल्याचे वाहन उत्पादकांच्या सियाम या संघटनेने सांगितले आहे. प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या 1 लाख 15 हजार 505 गाड्यांच्या तुलनेत यंदा 1 लाख 53 हजार 845 गाड्या झाली आहे. या विभागातील विक्रीची ही सलग 11व्या महिन्यातील वाढ आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर्स आणि जनरल मोटर्स या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ नोंदवली गेली आहे.

 

अर्थसंकल्पात सीमाशुल्कात वाढ केल्यामुळे गाड्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक ग्राहकांनी गाडी घेण्याचे आखलेले बेत अलीकडे आणले. त्यामुळे गाड्यांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे सियामचे महासंचालक दिलीप चेनॉय यांचे म्हणणे आहे.

 दुचाकी विभागात मोटारसायकल विक्रीत 30.72 टक्के वाढ होऊन 6 लाख 42 हजार 419 मेटारसायकली विकल्या गेल्या. व्यावसायिक किंवा अवजड वाहनांच्या विक्रीत भरघोस 87.11 टक्के वाढ झाली असून फेब्रुवारी 2009मधील 31 हजार 11 गाड्यांच्या तुलनेत यंदा 58 हजार 24 गाड्यांची विक्री झाली आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत 18.20 टक्के वाढ होऊन 73 हजार 812 गाड्या विकल्या गेल्या आहेत. ह्युंदाई मोटर्सच्या विक्रीतही 46.14  टक्के वाढ झाली असून या कंपनीच्या 31 हजार गाड्यांची विक्री झाली आहे. टाटा मोटर्सने 22 हजार 980 गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी 15 हजार 524 गाड्यांची विक्री कंपनीने केली होती. 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0