पहिले पान | अर्थजगत | एअर इंडियाला पाच हजार 400 कोटींचा तोटा

एअर इंडियाला पाच हजार 400 कोटींचा तोटा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आर्थिक संकटात सापडलेल्या आणि देशातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला 2009-10 या चालू आर्थिक वर्षात पाच हजार 400 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

नवी दिल्ली- आर्थिक संकटात सापडलेल्या आणि देशातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला 2009-10 या चालू आर्थिक वर्षात पाच हजार 400 कोटी रुपयांचा तोटा झाला असून हा तोटा येत्या आर्थिक वर्षातही कायम राहील, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मंगळवारी राज्यसभेत ते बोलत होते.

 एअर इंडियाला गेल्या तीन वर्षात एकूण 13 हजार 174.16 कोटी रुपये तोटा झाला आहे. त्यापैकी 2007-08 मध्ये दोन हजार 226.16, 2008-09मध्ये पाच हजार 548 कोटी रुपये तोटा झाला होता, तर 2009-10मध्ये हा तोटा पाच हजार 400 कोटी रुपये होईल, असा अंदाजही पटेल यांनी वर्तवला. कंपनीचा तोटा कमी करून तिला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे उपाय सुरू आहेत. मात्र 2009-10या वर्षात केवळ 753 कोटी रुपयांची शिल्लक टाकण्यात एअर इंडियाला यश आल्याचे पटेल म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0