पहिले पान | अर्थजगत | सात राज्यांतील बारा ‘सेझ’ रद्द

सात राज्यांतील बारा ‘सेझ’ रद्द

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

महाराष्ट्रासह दिल्ली, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सात राज्यांतील 12 सेझ प्रकल्प केंद्र सरकारने रद्द केले असल्याची माहिती राज्यसभेत गुरुवारी देण्यात आली.

नवी दिल्ली- महाराष्ट्रासह दिल्ली, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सात राज्यांतील 12 सेझ प्रकल्प केंद्र सरकारने रद्द केले असल्याची माहिती राज्यसभेत गुरुवारी देण्यात आली.

 

दिल्ली, ओरिसा, गुजरात आदी राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या 13 सेझ प्रकल्पांच्या विकासकांकडून सेझ नामनिर्देशन काढून घेण्याबाबत विनंती अर्ज करण्यात आले होते. यापैकी 12 सेझ प्रस्तावांना मान्यता मंडळाकडून मंजुरी देण्यात आली होती, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

 जोपर्यंत सेझ विकासकांकडून त्यांना मिळालेले लाभ किंवा शुल्कांमधील सवलती परत केल्या जात नाहीत तोपर्यंत अधिसूचना रद्द करता येऊ शकत नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. मान्यता मंडळाकडून अधिसूचना रद्द करण्यात आलेल्या सेझ प्रकल्पांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात आघाडीवर असलेल्या डीएलएफच्या हरियाणा, गुजरात आणि ओरिसामधील चार आयटी - आयटीइएस सेझ प्रकल्पांचा समावेश आहे. 

ओएनजीसीच्या गुजरात सेझला हिरवा कंदील

पेट्रोरसायन विभागासाठी सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी कंपनी उभारणार असलेल्या प्रस्तावित विशेष आर्थिक विभागाला (सेझ) पर्यावरण खात्याकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.

 

पर्यावरण खात्यातील तज्ज्ञांच्या मान्यता समितीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत गुजरातमधील भरूच येथे बांधण्यात येणार असलेल्या प्रस्तावित दाहेज सेझ प्रकल्पाला पर्यावरणदृष्ट्या मान्यता देण्यात आली. गुजरात औद्योगिक विकास महामंडळ आणि ओएनजीसी यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या दाहेज सेझ लिमिटेड या कंपनीकडून विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प अंदाजे  एक हजार 500 हेक्टर जागेवर असून त्यामध्ये विविध पेट्रोरसायन विभागांचा समावेश असेल.

 

या प्रकल्पासाठी एकूण खर्च 295 कोटी रुपये आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेपर्यंत विकसित झाल्यानंतर त्यात 50 ते 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

 सीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीच्या गुजरातमधील अहमदाबादेतील प्रस्तावित फाइझेड पार्कया अन्य विशेष आर्थिक विभागाला मात्र सरकारकडून मान्यता मिळालेली नाही.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0