PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अन्नधान्य महागाई दर 17.81 टक्के अन्नधान्य महागाई दर 17.81 टक्के ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 02:15:00 PM नवी दिल्ली- अन्नधान्य महागाई दरात अल्पशी घट होऊन 27 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात हा दर 17.81 टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात हा दर 17.87 टक्के होता. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, डाळींचे भाव 33.38 टक्क्यांनी वाढले असले तरी या किमतीत अगोदरच्या आठवड्याच्या तुलनेत 35 टक्क्यांनी घट झाली आहे. बटाट्यांचे दरही 22.46 टक्क्यांनी, तर कांद्याचे दर 2.98 टक्क्यांनी वाढले आहेत.