पहिले पान | अर्थजगत | निर्यातीची झेप कायम

निर्यातीची झेप कायम

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित देशांमधील अर्थव्यवस्था अद्यापही हव्यात या प्रमाणात सुधारणेच्या वाटेवर न आल्याचा परिणाम भारतीय निर्यातीवर झाला आहे. जुलै महिन्यात निर्यातीमध्ये 13.2 टक्क्यांनी वाढून ती 16.24 अब्ज डॉलवर गेलेली असली तरी यंदाच्या आर्थिक वर्षातील हे प्रमाण कमी आहे.

नवी दिल्ली- अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित देशांमधील अर्थव्यवस्था अद्यापही हव्यात या प्रमाणात सुधारणेच्या वाटेवर न आल्याचा परिणाम भारतीय निर्यातीवर झाला आहे. जुलै महिन्यात निर्यातीमध्ये 13.2 टक्क्यांनी वाढून ती 16.24 अब्ज डॉलवर गेलेली असली तरी यंदाच्या आर्थिक वर्षातील हे प्रमाण कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिन महिन्यांत जहाजाद्वारे होणा-या मालवाहतुकीमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

विकसित देशांनी विशेष आर्थिक साअंशत: मागे घेण्यास सुरुवात केलेली असल्यामुळे निर्यातीच्या घसरणीचा कल उर्वरित आर्थिक वर्षातही कायम राहील असे, वाणिज्य सचिव राहुल खुल्लर यांनी अलिकडेच म्हटले होते.

एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये देशाची निर्यात अनुक्रमे 36.2, 35.1 आणि 30.4 टक्क्यांनी वाढलेली होती. निर्यातीचे घटते प्रमाण लक्षात घेता 2010-11 वर्षातील 200 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी पिछाडीवर असलेल्या क्षेत्रांसाठी आणखी काही सवलती सरकारने जाहीर कराव्यात अशी असे मत उद्योग क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.या मागणीप्रमाणे सरकारने विदेश व्यापार धोरणामध्ये काही सवलती जाहीर केलेल्या आहेत. या सवलतींमुळे चालू आर्थिक वर्षातील निर्यातीचे लक्ष्य गाठता येऊ शकेल असा विश्वास अ‍ॅक्सिस बॅँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगाता भट्टाचार्य यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ राकेश मोहन जोशी यांनीही या सवलतींमुळे निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकेल असे म्हटले आहे. जागतिक पातळीवरील मागणी आटल्यामुळे 13 महिने घसरणीचा कल अनुभवल्यानंतर निर्यात पुन्हा सकारात्मक पातळीवर आली. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0