वित्तीय तूट 91 कोटी रुपयांवर
थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावातून अपेक्षेपेक्षा जास्त महसुली उत्पन्न मिळाल्यामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट 42 टक्क्यांनी कमी होऊन एप्रिल ते जुलै या तिन महिन्यांत 90 हजार 915 कोटी रुपयांवर आली आहे.
नवी दिल्ली- थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावातून अपेक्षेपेक्षा जास्त महसुली उत्पन्न मिळाल्यामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट 42 टक्क्यांनी कमी होऊन एप्रिल ते जुलै या तिन महिन्यांत 90 हजार 915 कोटी रुपयांवर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूटीच्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 23.8 टक्के आहे.
जुलैअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत केंद्र सरकारने थ्रीजी आणि ब्रॉडबॅँड वायरलेस अॅक्सेसच्या स्पेक्ट्रम लिलावातून 1.06 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत बिगर कर महसूल एक कोटी 25 लाख 703 हजार रुपयांचा मिळालेला असून संपूर्ण वर्षातील निर्धारित महसुलाच्या तुलनेत हे प्रमाण 84.9 टक्के आहे. अगोदरच्या वर्षात बिगर कर महसूल अंदाजित महसुलाच्या तुलनेत 13.6 टक्के नोंद झाला होता. दुस-या बाजुला याच कालावधीत कर रुपाने मिळणारा महसूल एक कोटी 12 लाख 821 हजार रुपयांवर गेला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी पाच कोटी 34 लाख 94 हजार रुपयांचे एकूण महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात एकूण खर्च एक कोटी नऊ लाख 800 हजार रुपये तर बिगर नियोजन खर्च दोन कोटी 22 लाख 900 हजार रुपये नोंद झाला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 11 कोटी आठ लाख 789 हजार रुपये खर्चाचे लक्ष्य ठेवले आहे.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा