पहिले पान | अर्थजगत | म्युच्युअल फंडांची आर्थिक प्रकृती पुन्हा सुदृढे

म्युच्युअल फंडांची आर्थिक प्रकृती पुन्हा सुदृढे

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

सलग दोन महिने घसरण अनुभवल्यानंतर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पुन्हा सुधारणा झाली आहे.

नवी दिल्ली- सलग दोन महिने घसरण अनुभवल्यानंतर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पुन्हा सुधारणा झाली आहे. रोकड सुलभतेची स्थिती सुसह्य झाल्यामुळे कंपन्या तसेच बॅँकांनी जास्तीत जास्त रक्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवली आहे. परिणामी ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 3.30 टक्क्यांनी वाढ होऊन ती 6.87 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्तेत 21 हजार 992 कोटी रुपयांची भर पडली आहे. देशातील 39 फंड हाऊसेसच्या व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता ऑगस्ट महिन्याच्या अखेर सहा कोटी 87 लाख 559 हजार 54 रुपयांवर गेली आहे.देशातील सर्वात मोठा म्युच्युअल फंड म्हणून ओळखल्या जाणा-या रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 2.28 टक्क्यांची किंवा 2332 कोटी रुपयांची भर पडून ती 1.04 लाख कोटी रुपयांवर गेली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

कंपन्या आणि बॅँकांनी रक्कम काढून घेतल्यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यात म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मोठ्या प्रमाणावर घसरलेली होती. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये सेन्सेक्सने 0.06 अंकांची कमाई करूनदेखील म्युच्युअल फंडांनी समभाग बाजारपेठेत गुंतवणूक करणे टाळले. ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडांनी कर्ज साधनांमध्ये 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली पण समभागांमधून 3,169.60 कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0