चांदीचा उच्चांक..31,500!
जागतिक सराफा बाजारातील तेजी आणि त्यातच देशातील औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे एक किलो चांदीचा भाव 31 हजार 500 रुपयांच्या नव्या विक्रमी पातळीवर गेला.
मुंबई- साठेबाज आणि दलालांनी केलेल्या विक्रीच्या मा-यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले असले तरी चांदीची चमक मात्र जास्त वाढली आहे.जागतिक सराफा बाजारातील तेजी आणि त्यातच देशातील औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे एक किलो चांदीचा भाव 31 हजार 500 रुपयांच्या नव्या विक्रमी पातळीवर गेला. आर्थिक मंदीमुळे मौल्यवान धातूंना मागणी येण्याची अपेक्षा मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे जागतिक पातळीवरील सराफा बाजारात सोन्याच्या भावाने गेल्या दोन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.
बुधवारी सराफा बाजार बंद झाला त्यावेळी सोन्याने 19 हजार 140 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. परंतु शुक्रवारी दहा ग्रॅम सोन्याच्या भावात 75 रुपयांची घट होऊन तो 19 हजार 65 रुपयांवर आला. परंतु चांदीच्या मागणीत मात्र सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी 31 हजार 300 रुपयांवर बंद झालेला चांदीचा भाव शुक्रवारी तब्बल 205 रुपयांनी वाढून 31 हजार 505 रुपयांवर गेला. दिल्लीच्या सराफा बाजारातही दहा ग्रॅम सोन्याचा भाव 105 रुपयांनी घसरून 19 हजार 300 रुपयांवर आला तर दहा किलो चांदीच्या भावाने 31 हजार 150 रुपयांची वर्षातील सर्वोत्तम पातळी गाठली आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा