बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मिती
ऑगस्ट महिन्यात देशात रोजगारनिर्मिती वेगाने झाल्याचा निष्कर्ष ‘नोकरी जॉब स्पिक’ या संस्थेने काढला आहे. आपल्या सर्वेक्षणात ‘नोकरी जॉब स्पिक’ने म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये नव्या रोजगारांमध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत सात टक्के वाढ दिसून आली आहे.
मुंबई- ऑगस्ट महिन्यात देशात रोजगारनिर्मिती वेगाने झाल्याचा निष्कर्ष ‘नोकरी जॉब स्पिक’ या संस्थेने काढला आहे. आपल्या सर्वेक्षणात ‘नोकरी जॉब स्पिक’ने म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये नव्या रोजगारांमध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत सात टक्के वाढ दिसून आली आहे. त्याचप्रमाणे नव्या नोक-या निर्माण करण्यात तसेच नोक-या देण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राने आघाडी घेतली आहे. याचवेळी बँकिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडून अधिकाधिक मनुष्यबळाची मागणी नोंदवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेची सुधारलेली स्थिती आणि व्यवसाय क्षेत्राने अर्थव्यवस्थेवर दाखवलेला विश्वास यामुळे ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्या रोजगारनिर्मितीत 28 टक्के वाढ झाली आहे. बँकिंग आणि अभियांत्रिकी वगळता अन्य क्षेत्रांतही नव्या नोकरभरतीला चालना मिळू लागली आहे. नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी चालू आर्थिक वर्षाची दुसरी सहामाही अधिक योग्य असेल, असे मत इन्फोएजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक हितेश ओबेरॉय यांनी व्यक्त केले आहे. ओबेरॉय यांच्या म्हणण्यानुसार, ‘आयटी’वर आधारित उद्योग आणि बांधकाम व्यवसाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवे रोजगार निर्माण होत आहेत.
वरील सर्वेक्षणानुसार 10 औद्योगिक क्षेत्रांपैकी पाच औद्योगिक क्षेत्रांनी तसेच 10 क्रियाशील उद्योगांपैकी नऊ उद्योगांनी मासिक सकारात्मक वाढ नोंदवली आहे. देशातील चार महानगरांपैकी चेन्नईने सर्वाधिक नोक-यांची निर्मिती केली आहे. विमा क्षेत्राने रोजगारनिर्मितीच्या बाबतीत निराशा केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विमा क्षेत्रात 40 टक्के कमी रोजगारनिर्मिती झाली आहे. दूरसंचार, तेल आणि वायू तसेच औषध या उद्योगांमध्ये अनुक्रमे 7, 8 आणि 14 टक्के कमी रोजगारनिर्मिती झाली आहे. कौशल्यांवर आधारित रोजगाराच्या संधी अभियांत्रिकी क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत. सॉफ्टवेअर, उत्पादन आणि मनुष्यबळ या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या नोक-या उपलब्ध होत आहेत. मात्र विक्री आणि व्यवसाय विकास या क्षेत्रांमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी रोजगारनिर्मिती झाली आहे. चेन्नईखालोखाल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या नोक-या निर्माण झाल्या आहेत. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांतून नोक-या निर्माण होण्याचा वेग काहीसा स्थिर राहिल्याचे ‘नोकरी जॉब स्पिक’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा