पहिले पान | अर्थजगत | सेन्सेक्स पुन्हा तंदुरुस्त!

सेन्सेक्स पुन्हा तंदुरुस्त!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गुंतवणूकदार, वित्तसंस्था, कंपन्या आणि सेवा क्षेत्र या सर्वाना दिलासा देत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी, आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी 338 अंकांची उसळी घेतली. गेल्या 31 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच सेन्सेक्सने इतकी मोठी भरारी मारली आहे.

मुंब- गुंतवणूकदार, वित्तसंस्था, कंपन्या आणि सेवा क्षेत्र या सर्वाना दिलासा देत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी, आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी 338 अंकांची उसळी घेतली. गेल्या 31 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच सेन्सेक्सने इतकी मोठी भरारी मारली आहे.

अमेरिकेत नोकरीच्या नव्या संधी पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर निर्माण होऊ लागल्याचे वृत्त येऊन थडकल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक लाट आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सेन्सेक्सने ही मोठी उडी मारली आहे. दिवसभरात धातू आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे 30 कंपन्यांच्या कामगिरीवर आधारलेला सेन्सेक्स 338.62 अंकांनी वधारत 18560.05 अंकांवर बंद झाला. 5 फेब्रुवारी 2008 नंतर प्रथमच सेन्सेक्सने गुंतवणूकदारांचे इतक्या मोठ्या अंकांनी समाधान केले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 1.78 टक्के वाढत 5576.95 अंकांवर बंद झाला.

जागतिक स्तरावरील भांडवल बाजारात खेळत्या पैशात सुधारणा झाल्यामुळे तसेच अमेरिकेतील खासगी कंपन्यांतून नोकरीच्या संधींत वाढ आणि उत्पादनात झालेली सुधारणा यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती वेगाने सुधारेल, हा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. विदेशातून आलेल्या या सकारात्मक लाटेचा फायदा मुंबई शेअर बाजाराला मिळाल्याचे सीएनआय रिसर्चचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक किशोर ओस्तवाल यांनी सांगितले.

सेन्सेक्सच्या वाटचालीत सर्वाधिक सहभाग असणा-या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांना तीन टक्के फायदा मिळाला आणि तो 953.20 रुपयांवर जाऊन पोहोचला. यापूर्वीच्या सौद्यात हा समभाग 1.23 टक्के कोसळला होता. सोमवारच्या सेन्सेक्सच्या बढतीत धातू क्षेत्राचा सिंहाचा वाटा राहिला. टाटा स्टील आणि हिंदाल्को यांचे समभाग सर्वाधिक वधारले. टाटा स्टीलचा समभाग 6.60 टक्के वाढला. हिंदाल्कोचा समभाग 4.78 टक्के वर गेला. या दरवाढीला कुमारमंगलम बिर्ला यांची 21 हजार कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या घोषणेची मदत मिळाली. स्टरलाइटचा समभाग 3.69 टक्के तर जिंदाल स्टीलचा समभाग 1.68 टक्के वधारला. विदेशी बाजारात भारतीय वस्तूंना वाढती मागणी निर्माण होईल, असा कयास लावत गुंतवणूकदारांनी धातू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठय़ा प्रमाणावर खरेदी केले.

गुंतवणूकदारांनी धातूखालोखाल बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग अधाशीपणे खरेदी केले. आयसीआयसीआय बँकेचा समभाग 3.81 टक्के, स्टेट बँकेचा समभाग 3.07 टक्के, एचडीएफसीचा समभाग 0.67 टक्के आणि एचडीएफसी बँकेचा समभाग 0.55 टक्के वधारला. अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणांचे स्पष्ट संकेत मिळाल्यामुळे आयटी क्षेत्रासाठी ही सुवार्ता ठरली. परिणामी, आयटी क्षेत्राचा निर्देशांक वर गेला. टीसीएसचा समभाग 1.89 टक्के, इन्फोसिसचा समभाग 2.16 तर विप्रोचा समभाग 0.82 टक्के वाढला.

सोमवारी सर्व विभागीय निर्देशांक हरित पट्टयात गेले. त्यात धातू, बँकिंग, स्थावर मालमत्ता तसेच तेल आणि नैसर्गिक वायू हे क्षेत्रीय निर्देशांक आघाडीवर राहिले. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील डीएलएफचा समभाग

1.66 टक्के आणि जयप्रकाश असोसिएट्सचा समभाग 3.28 टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्स ठरवणा-या 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांना सोमवारी दिवसअखेर फायदा झाला. जागतिक स्तरावर आशियाई निर्देशांक चांगल्या पातळीवर बंद झाले. चीनचा शांघाय निर्देशांक 1.5 टक्के तर जपानचा निक्की निर्देशांक 2.05 टक्के वधारला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0