PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: निर्यातीमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढ निर्यातीमध्ये 9.3 टक्क्यांनी वाढ ================================================================================ पीटीआय on 01 February, 2010 04:15:00 PM नवी दिल्ली- जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने घटणा-या निर्यातीमध्ये गेले दोन महिने वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2009 मध्ये निर्यातीत 9.3 टक्के वाढ झाली असून भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे हे लक्षण समजले जात आहे. भारताच्या आयातीमध्येही गेले 11 महिने सतत घट नोंदवली जात होती. मात्र डिसेंबर 2009 मध्ये आयातही 27.2 टक्क्यांची वाढली आहे. जागतिक मंदीमुळे निर्यातीमध्ये सलग १३ महिने घट झाली होती. मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून निर्यातीच्या दरात वाढ झाली आहे.