थेट परदेशी गुंतवणुकीत 25 टक्क्यांनी घट
देशातील थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये जानेवारी महिन्यात 25 टक्के घट नोंदवली गेली आहे.
नवी दिल्ली- देशातील थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) जानेवारी महिन्यात 25 टक्के घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात थेट परदेशी गुंतवणुक 2.04 अब्ज रुपये इतकी होती.
गेल्या तीन महिन्यांत एफडीआयमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र जानेवारी महिन्यात हा ओघ नेमका कशामुळे घटला याचे नेमके कारण सांगण्यात आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी असमर्थता दर्शवली आहे.
जानेवारी 2009 मध्ये 2.73 अब्ज रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती, तर ऑक्टोबर 2009 मध्ये 2.33 अब्ज रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली होती. डिसेंबरमध्ये या गुंतवणुकीत 13 टक्क्यांनी वाढ झाली होती. जानेवारी महिन्यात मात्र एफडीआयचा ओघ एकदम कमी झाला आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा