अन्नधान्य महागाई दरात घट
अन्नधान्य महागाई दरात घट झाली असून 24 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर 9.53 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
नवी दिल्ली- अन्नधान्य महागाई दरात घट होण्याचे सत्र कायम असून 24 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर 9.53 टक्के इतका नोंदवण्यात आला. त्याअगोदरच्या आठवड्यात हा दर 9.67 टक्के इतका नोंदवण्यात आला होता.
महागाईच्या मुद्दयावरुन गेले काही दिवस विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. मात्र सलग दुस-या आठवड्यात अन्नधान्य महागाई दर एक आकडी नोंदवला गेल्यामुळे सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बाजारपेठेत अन्नधान्याची आवक वाढल्यानंतर अन्नधान्य महागाई दरात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाज्या 17.32 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत, तर कांदे, बटाटे अनुक्रमे 41 आणि चार टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा