पहिले पान | अर्थजगत | 2009-10 मध्ये विकासदर 7.2 टक्के?

2009-10 मध्ये विकासदर 7.2 टक्के?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

2009-10 या आर्थिक वर्षात विकासदर 7.2 टक्के राहील, असे अनुमान केंद्र सरकारच्या मध्यवर्ती सांख्यिकी संस्थेने वर्तवले आहे.

नवी दिल्ली- जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दिलेले प्रोत्साहन पॅकेज कायम ठेवावे की नाही या मुद्दयावर वाद चालू असतानाच, 2009-10 या आर्थिक वर्षात विकासदर 7.2 टक्के राहील, असे अनुमान केंद्र सरकारच्या मध्यवर्ती सांख्यिकी संस्थेने वर्तवले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वर्तवलेल्या विकासदराच्या अंदाजापेक्षा हा विकासदर किंचित कमी आहे.

मागील आर्थिक वर्षातील विकासदरापेक्षा मात्र हा अंदाजित विकासदर 0.6 टक्क्यांनी जास्त आहे. मागील आर्थिल वर्षात विकासदर 6.7 टक्के होता. अर्थात या आर्थिक वर्षात कृषी उत्पादनामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. कृषी उत्पादन गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी कमी होईल, तर सेवा क्षेत्राच्या उत्पादनामध्ये मध्यम प्रमाणात वाढ होईल, असे अनुमान आहे.  

औद्योगिक उत्पादनामध्ये मात्र 8.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच प्रोत्साहन पॅकेज टप्प्याटप्प्याने काढून घेण्याच्या प्रस्तावाला पुष्टी मिळणार आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0