पहिले पान | अर्थजगत | पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के

पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीमुळे एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर 8.8 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

नवी दिल्ली- उत्पादन क्षेत्रातील जोरदार वाढीमुळे चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर 8.8 टक्के इतका नोंदवला गेला आहे. या तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर 12.4 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षात याच काळात हा दर 3.8 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. या विकासदराबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आर्थिक धोरणे योग्य पद्धतीने राबवली जात असल्यामुळेच ही वाढ झाल्याचे मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.  एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये  विमा, बांधकाम आदी व्यवसायक्षेत्रांमध्ये आर्थिक विकास वाढीचा दर समाधानकारक नोंदवण्यात आला आहे. वित्तीय सेवा क्षेत्राच्या विकासदरात विशेष वाढ झाली नसून या वर्षी हा दर सहा टक्के इतका नोंदवण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास दर 2.8 टक्के इतका नोंदवण्यात आला. मागील वर्षीच्या 1.9 टक्क्यांच्या प्रमाणात हा दर अधिक असला तरी या वर्षात कृषी क्षेत्रातील विकास दर चार टक्के नोंदवला जाईल अशी सरकारची अपेक्षा होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बांधकाम क्षेत्राचा आर्थिक विकास दर 7.5 टक्के इतका नोंदवण्यात आला. आधीच्या वर्षात याच काळात हा दर 4.6 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. सामाजिक आणि वैयक्तिक सेवा दराच्या विकास दरातील वाढ मंदावली असून हा दर 6.7 टक्के इतका नोंदवण्यात आला. यापूर्वी हा दर 7.6 टक्के इतका नोंदवण्यात आला होता.  

व्यापार, हॉटेल आणि दळणवळण क्षेत्रातील आर्थिक विकास दरात लक्षणीय वाढ झाली असून मागील वर्षाच्या 5.5 टक्क्यांच्या तुलनेत हा दर 12.2 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. 


Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0