सेन्सेक्सचा पाच आठवड्यांतील उच्चांक
आयसीआयसीआयसह आणखी काही बँकांचे उत्तम तिमाही अहवाल आणि समाधानकारक पावसामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी गेल्या पाच आठवड्यांतील उच्चांक गाठला.
मुंबई- आयसीआयसीआयसह आणखी काही बँकांचे उत्तम तिमाही अहवाल आणि समाधानकारक पावसामुळे मुंबई शेअर बाजारात सोमवारी तेजीचे वातावरण होते. निर्देशांकाने दिवसभरात 213 अंकांच्या वाढीसह गेल्या पाच आठवड्यांतील उच्चांक गाठला. गेल्या तीन दिवसांतील घसरणीमुळे 18 हजारांचा टप्पा गाठू न शकलेला बाजार 18,081.21 अंकांवर बंद झाला.
बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू तसेच बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 1.19 टक्क्यांनी वाढ होऊन तो 5,431.65 अंकांवर बंद झाला.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा