सेन्सेक्सची तब्बल 333 अंकांची उसळी
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला असून बुधवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 333 अंकांनी वाढ झाली.
मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला असून बुधवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 333 अंकांनी वाढ झाली. मंगळवारी 192 अंकांनी घसरलेला निर्देशांक ही घट भरून काढत 16,496.05 अंकांवर बंद झाला.
धातू आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी वाढल्यामुळे निर्देशांकाने ही उसळी मारल्याचे माहितगारांनी सांगितले. गेल्या २३ डिसेंबरनंतर निर्देशांकात झालेली ही सर्वोच्च वाढ आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात निफ्टीमध्येही बुधवारी 101.75 अंकांची वाढ होऊन तो 4,931.85 अंकांवर बंद झाला.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा