सेन्सेक्समध्ये 271 अंकांची घसरण
मुंबई शेअर बाजाराचा बुधवारच्या दिवसभरात उसळलेला निर्देशांक गुरुवारी पुन्हा घसरला.
मुंबई- मुंबई शेअर बाजाराचा बुधवारच्या दिवसभरात उसळलेला निर्देशांक गुरुवारी पुन्हा घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारांतील मंदीचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने निर्देशांकात 271 अंकांनी घसरण झाली.
निर्देशांक गुरुवारी सकाळीच 79 अंक खाली उघडला. त्यानंतर दिवसभर त्यात घसरणच होत राहिली. शेवटी तो 16,224.95 अंकांवर बंद झाला. बुधवारी निर्देशांकात 332.61 अंकांची अनपेक्षित वाढ झाली होती. गुरुवारी जाहीर झालेल्या अन्नधान्य महागाई दरांचा परिणामही बाजारावर झाल्याचे माहितगारांनी सांगितले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 86.50 अंकांची घट होऊन तो 4845.35 अंकांवर बंद झाला.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा