PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सेन्सेक्सचा तीन महिन्यांतील नीचांक सेन्सेक्सचा तीन महिन्यांतील नीचांक ================================================================================ पीटीआय on 05 February, 2010 06:15:00 PM मुंबई- गुंतवणुकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल 430 अंकांनी कोसळला. तीन महिन्यांनंतर निर्देशांक 16,000 अंकांच्या खाली गेला आहे. निर्देशांक दिवसाखेर 15,790.93 अंकांवर बंद झाला. निर्देशांकाचा हा गेल्या तीन महिन्यातील नीचांक आहे. गुरुवारीही निर्देशांकाने 271 अंकांची आपटी खाल्ली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे आशियातील बहुतेक शेअर बाजार गेले दोन दिवस कोसळत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीही 126.70 अंकांनी कोसळून 4,718.65 अंकांवर बंद झाला.