पहिले पान | अर्थजगत | आरबीआय भांडवल पुरवठा कमी करणार?

आरबीआय भांडवल पुरवठा कमी करणार?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भांडवल पुरवठा आखडता घेणार असल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

मुंबई- वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भांडवल पुरवठा आखडता घेणार असल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाला धक्का न लावता महागाई दर आटोक्यात आणणे आव्हानात्मक असल्याचे बँकेने नमूद केले आहे.

सध्या महागाई अन्नधान्यापुरती मर्यादित असली तरी लवकरच अन्य वस्तूंचे दरही प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी बाजारातील रोखता कमी करण्याचे संकेत बँकेने दिले आहेत.   

बाजारातील भांडवलाचे प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक साधारणपणे रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर)., वैधानिक रोखता प्रमाण (एसएलआर) आदींमध्ये  वाढ करते. त्यामुळे शुक्रवारी जाहीर होणा-या तिमाही पतधोरणातही सीआरआर, एसएलआरमध्ये वाढ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0