सेन्सेक्समध्ये 124 अंकांची घट
उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे तिमाही अहवाल अपेक्षेपेक्षा वाईट आल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 124 अंकांची घसरण होऊन तो 17,868.29 बंद झाला.
मुंबई- उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे तिमाही अहवाल अपेक्षेपेक्षा वाईट आल्याचा फटका शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराला बसला. निर्देशांकात 124 अंकांची घसरण होऊन बाजार 17,868.29 बंद झाला. जागतिक स्तरावरील मंदीचाही परिणाम निर्देशांकावर झाला.
बांधकाम, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात दिवसभर मंदीचे वातावरण होते.
हिरो होंडा तसेच ओएनजीसीसारख्या कंपन्यांचे पहिले तिमाही अहवाल अपेक्षेपेक्षा वाईट आल्यानेच शेअर बाजारात मंदी होती, असे मत संबंधितांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 0.76 टक्क्यांनी घट होऊन तो 5,367.60 अंकांवर बंद झाला.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा