वाहनकर्ज महागणार
आयसीआयसीआयसह खासगी क्षेत्रातील काही बँकांनी वाहन कर्जांवरील व्याजदरात पाव ते अर्धा टक्क्याने वाढ केली आहे.
मुंबई- व्याजदरांमध्ये वाढ होणार असल्याच्या अटकळी जोरात असतानाच, खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक आयसीआयसीआयने वाहन कर्जांवरील व्याजदरांमध्ये अर्धा टक्क्याने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गृहकर्जांवरील साडेआठ टक्के व्याजदराची विशेष योजनाही बँकेने मागे घेतली आहे. एचडीएफसी बँकेनेही स्वस्त गृहकर्ज योजना मागे घेतली आहे.
पाच मार्चपासून वाहन कर्जांवरील व्याजदर पाव ते अर्धा टक्क्याने वाढवले जाणार असल्याचे आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले. बँकेने व्याजदरामध्ये वाढ करण्याची कारणे स्पष्ट केलेली नसली तरी भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात सीआरआरमध्ये वाढ केल्याचेच हे पडसाद असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बाजारातील अतिरिक्त रोखता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआरमध्ये पाऊण टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळेच वाहन कर्जांवरील व्याजदर वाढवले गेले असावेत, असा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयसीआयसी बँकेने गृहकर्जांवरील विशेष व्याजदराची योजनाही मागे घेतली आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. कोटक महिंद्रा आणि आणखी काही खासगी बँकांनीही वाहन कर्जांच्या व्याजदरात वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जांच्या दरात फेब्रुवारीमध्येच पाव ते अर्धा टक्क्याने वाढ केली आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा