ब्लॅकबेरी उत्पादक अखेर नमले
ब्लॅकबेरीमार्फत होणा-या संदेशवहनावर नियंत्रण ठेवणारे तंत्रज्ञान अस्तित्वातच नाही, असा दावा दोन महिन्यांपूर्वी करणा-या रिसर्च इन मोशनने, हे तंत्रज्ञान त्वरित उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.
नवी दिल्ली- ब्लॅकबेरीमार्फत होणा-या संदेशवहनावर नियंत्रण ठेवणारे तंत्रज्ञान अस्तित्वातच नाही, असा दावा दोन महिन्यांपूर्वी करणा-या रिसर्च इन मोशनने, हे तंत्रज्ञान त्वरित उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. संदेशवहनावर नियंत्रण ठेवणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले नाही, तर 31 ऑगस्टपासून ब्लॅकबेरी सेवेवर बंदी घालण्याचा इशारा भारत सरकारने दिला आहे. ही मुदत संपण्यास अवघा एक दिवस उरला असताना ब्लॅकबेरी उत्पादक रिसर्च इन मोशन कंपनीने अखेर नमते घेतले आहे.
ब्लॅकबेरी इंटरप्रायजेस सर्व्हिसेस तसेच ब्लॅकबेरी मेसेंजर सर्व्हिसेसमार्फत होणा-या माहितीच्या वहनावर अधिकृतरीत्या नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने भारत सरकारला प्रस्ताव दिला आहे. कायदा अमलबजावणी यंत्रणेमार्फत सुरक्षा संस्थांना ब्लॅकबेरीमार्फत होणा-या संदेशवहनावर नियंत्रण ठेवता येईल.
ब्लॅकबेरीमार्फत होणा-या माहितीच्या वहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिसर्च इन मोशन कंपनीने प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावांची व्यवहार्यता तपासून बघितली जाईल, असे केंद्रीय गृहखात्याच्या पत्रकात म्हटले आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा