स्विस बँकांमधील खात्यांची चौकशी शक्य?
भारतीयांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचे तपशील मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भारत आणि स्वित्झर्लंड या देशांनी सुधारित दुहेरी करआकारणी प्रतिबंध करारावर सोमवारी स्वाक्ष-या केल्या.
नवी दिल्ली- भारतीयांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचे तपशील मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भारत आणि स्वित्झर्लंड या देशांनी सुधारित दुहेरी करआकारणी प्रतिबंध करारावर सोमवारी स्वाक्ष-या केल्या. अनेक भारतीयांनी कर चुकवण्यासाठी काळा पैसा स्विस बँकांमध्ये ठेवल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने सुमारे दीड वर्षांपूर्वी केला होता.
मात्र परस्परांच्या बँक खात्यांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात करार नसल्याने यासंदर्भात तपशील मिळवणे केंद्र सरकारला शक्य नव्हते. स्विस बँकांमधील भारतीय पैसा परत आणण्याचे वायदे भाजपने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात केले होते.
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री मिचेलीन कामी-रे यांनी राजधीनीत या करारावर स्वाक्ष-या केल्या. या करारामुळे आता दोन्ही देशांना परस्परांच्या बँकांमधील खात्यांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण शक्य होणार आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना अर्थात ओईसीडीने घालून दिलेल्या निकषांनुसार, करआकारणी, बँकखात्यांचे तपशील परस्परांना देण्याची तरतूद या करारात आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा