पहिले पान | अर्थजगत | जीएसटी विधेयकाच्या मसुद्याला राज्यांचा आक्षेप

जीएसटी विधेयकाच्या मसुद्याला राज्यांचा आक्षेप

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

एसटी विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याला बहुतेक राज्यांनी आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली- वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीच्या अमलबजावणीसाठी सर्व राज्य सरकारांनी तसेच विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत केले असले, तरी जीएसटी विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याला बहुतेक राज्यांनी आक्षेप घेतला आहे.

सर्व आर्थिक निर्णयांमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांना अंतिम अधिकार देण्याच्या जीएसटी विधेयकातील तरतुदीमुळे राज्य सरकारांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आक्षेप अनेक राज्य सरकारांनी नोंदवला आहे. यामुळे राज्य सरकारांना जीएसटीचा लाभ कमी प्रमाणाच मिळेल. त्यामुळे राज्यपातळीवरील जीएसटी रचनेत केंद्रीय अर्थमंत्र्यांना सर्वाधिकार देण्यास राज्ये तयार नाहीत, असे सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समूहातील मंत्री असीम दासगुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले.

पुढील आर्थिक वर्षापासून जीएसटी लागू व्हावा यासाठी सर्व राज्य सरकारांनी तसेच विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुखर्जी यांनी महागाईवरील भाषणात केले. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कररचनेत सुधारणा होणे अपेक्षित असून यामुळे एकंदर महागाईवरही नियंत्रण ठेवता येईल, असे ते म्हणाले. मात्र जीएसटी विधेयकाचा मसुदा सध्या आहे त्या स्वरूपात स्वीकारण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे दासगुप्ता म्हणाले. 

केंद्रीय स्तरावरील उत्पादन शुल्क आणि सेवाकराची जागा जीएसटी घेईल. त्याचप्रमाणे राज्य स्तरावरील मूल्यावर्धित कर, उपकर, अधिभार आणि स्थानिक करही जीएसटीमुळे मोडीत निघतील. देशातील भाजपशासित राज्ये या कराच्या अमलबजावणीबाबत साशंक आहेत.  

जीएसटी वाद निवारण प्राधिकरणाबाबतही राज्य सरकारांचा आक्षेप आहे. या प्राधिकरणासाठी घटनादुरुस्ती न करता जीएसटी कायद्यात तरतूद ठेवली जावी, असे मत दासगुप्ता यांनी व्यक्त केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0