पहिले पान | अर्थजगत | पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या

पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन आणि सीमाशुल्कांत वाढीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे दोन रुपये 71 पैसे आणि दोन रुपये 55 पैशांनी वाढ होणार आहे.

नवी दिल्ली- पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन आणि सीमाशुल्कांत वाढीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे दोन रुपये 71 पैसे आणि दोन रुपये 55 पैशांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील सीमाशुल्क अडीच टक्क्यांवरून साडेसात टक्के केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणे पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे एक रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे चार रुपये 60 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात कच्च्या तेलावर पाच टक्के आयात शुल्क लावण्यात आले असून त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0