Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News: सेवा कर पुन्हा 12 टक्के होणार? सेवा कर पुन्हा 12 टक्के होणार? ================================================================================ पीटीआय on 31 January, 2010 08:30:00 PM नवी दिल्ली- आर्थिक तुटीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून येत्या अर्थसंकल्पात सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. २००९ सालच्या अर्थसंकल्पात, सेवा कर 12 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला होता. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सेवा करात दोन टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यामुळे सेवा क्षेत्राकडून येणारा महसूल कमी झाल्याने सेवा कर पुन्हा 12 टक्के केला जाणार असल्याचे माहितगारांनी सांगितले.