विकासदर चांगला; मात्र सेन्सेक्समध्ये घट
चालू अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के इतका नोंदवला जाऊनही ही जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 61 अंकांनी घसरला.
मुंबई- चालू अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के इतका नोंदवला जाऊनही ही जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 61 अंकांनी घसरला.
आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदर समाधानकारक नोंदवला जाऊनही अमेरिकी आणि आशियाई बाजारपेठांतील मंदीच्या वातावरणामुळे शेअर बाजारात मंगळवारी मंदीचे वातावरण होते.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात तब्बल 212.12 अंकांनी कोसळला होता. मात्र बाजारपेठ बंद होण्याच्या वेळी त्यात सुधारणा झाली. दिवसाखेर निर्देशांकात 60.99 अंकांची घट होऊन तो 17,971.12 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील रिलायन्सच्या समभागाच्या किमतीत तीन टक्क्यांनी घट होऊन 918.85 रुपयांवर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 0.24 टक्क्यांनी घट होऊन तो 5,402.40 अंकांवर बंद झाला.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा