सेन्सेक्सची 235 अंकांची उसळी
पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के इतका नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी करण्याचा सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी 235 अंकांची उसळी घेतली.
मुंबई- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर 8.8 टक्के इतका नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी करण्याचा सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी 235 अंकांची उसळी घेतली. सेन्सेक्सचा हा महिन्याभरातील उच्चांक आहे
आर्थिक विकासदर 8.8 टक्के इतका नोंदवला गेल्यानंतर मंगळवारी सेन्सेक्स 61 अंकांना घसरला होता. मात्र बुधवारी बाजारपेठेत तेजीचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 234.75 अंकांची वाढ होत तो 18,205.87 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 1.29 टक्क्यांनी वाढ होऊन तो 5,471.85 अंकांवर बंद झाला.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा