पहिले पान | कोलाज | बाओबाब गोरखचिंच

बाओबाब गोरखचिंच

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

महाकाय गोरखचिंच बहुगुणी आणि बहुपयोगी आहे. या वृक्षाचं मूळ भारतात नसलं, तरी अनेक प्राचीन ग्रंथांत या वृक्षाचे संदर्भ सापडतात. महत्त्वाचं म्हणजे या वृक्षाखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केलं, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचं सांगितलं जातं.

गोरखचिंच हा पुरातन, अजब आणि अभ्यासनीय वृक्ष आहे. याचं आफ्रिकन नाव बाओबाब म्हणजे ज्येष्ठवर्य. याच अर्थाने म्हणजे आदरार्थी. हा शब्द गोव्यात वापरला जातो. प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर यांना बाकीबाब हा शब्द याच अर्थाने वापरला जायचा. गोरक्षनाथांनी या वृक्षाखाली विद्यार्थ्यांना विद्यादान केलं, म्हणून या वृक्षाला गोरखचिंच हे नाव पडलं; असं म्हटलं जातं. विस्तीर्ण आकारमानामुळे याला सैतान असंही म्हणतात.याची उंची 50 फुटांपर्यंत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ 100 फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो, तर फुलं मांसल 5 पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. फुलं रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. वटवाघळांचं या झाडावर वास्तव्य असतं. त्यांच्या माध्यमातूनच परागीकरण होतं. फुलं जमिनीवर पडल्यावर भुरकट रंगाची होतात आणि त्यांना उग्र वास येतो. फुलांचा हंगाम मे-जून असतो. याची फळं मोठी बाटलीच्या आकाराची, भुरकट, लव असलेली आणि वीतभर लांब असतात. पिकल्यावर ती टणक होतात. माकडं व माणसांद्वारे या वृक्षाच्या बियांचा प्रसार होतो.

हे दुर्मीळ झाड असून याचं मूळ स्थान आफ्रिकेत आहे. मात्र भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलिया मोझांबिक येथेही हा वृक्ष आढळतो. ऑस्ट्रेलियात याचं वय 6 हजार वर्ष आहे. तर भारतातही या वृक्षाच्या नोंदी प्राचीन काळापासून सापडतात. या वृक्षाचं रूप एकदम वेगळं असतं. जमिनीलगतचा बुंधा 10 मीटर व्यासाचाही असतो. उंचीकडे तो निमुळता होतो आणि तेथून फांद्या फुटतात. वर्षातले 10-11 महिने हा वृक्ष उघडाबंब, म्हणजे बहुतांशी निष्पर्ण असतो. जूनमध्ये त्याच्यावर पानांची गर्दी दिसते. पाच दलांची सावरीच्या निष्पर्ण पानांसारखी पानं असतात. फुलं पांढ-या रंगाची मांसल आणि पाचच पाकळय़ांची असतात. एका मांसल दांडय़ावर पुंकेसरांचा चेंडू आणि त्यावर शेंडीसारखा स्त्रीकेसर लटकत असतो. फुलं गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळं येतात. ती कपाशीच्या बोंडासारखी दिसतात. माकडांना याची कच्ची फळं खूप आवडतात.

 फळातला गर औषधी असून, तहान व उष्णता कमी करणारा असतो. वाळवंटी प्रदेशात उष्णतेच्या व्याधींवर गोरखचिंचाचा गर हा नैसर्गिक उपचार मानला जातो. महत्त्वाचं म्हणजे व्रणांवर या गराचा लेप, तर दमा, अतिसारावरही गर उपयुक्त असतो. मुलांना पुष्टतेसाठी गोरखचिंचाची साल उकळलेल्या पाण्याने आंघोळ घालतात. या चिंचेत भरपूर पाणी असतं. मोठय़ा झाडाच्या बुंध्यात तर काही हजारो लिटर्स पाणी असू शकतं.

या झाडाचा बुंधा मोठा असल्याने अनेक ठिकाणी त्याचा वापर घरासारखा केला जातो. तर परदेशात काही ठिकाणी याचा वापर बस थांबा, दारू साठवण्याची जागा म्हणूनही केला जातो. या झाडाच्या पोकळ भागात 25-30 माणसं आरामात विश्रांती घेऊ शकतात.

 

याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. याच्या पानांत जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम, टार्टरेट असतं. याच्या ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. गरापासून शीत पेय करतात. त्याचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो. जंगली प्राणी याची पानं आवडीने खातात. माणसं खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात. खोडाच्या आंतर सालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. फळाच्या वाळलेल्या करवंटय़ांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलकं असतं. त्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होडय़ा तयार केल्या जातात. अंतर्साल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी करतात. साधारणपणे 33 फूट व्यास असलेल्या गोरखचिंचेच्या झाडाचं वय दोन हजार वर्ष असू शकतं. आफ्रिकन याची पूजा समृद्धीसाठी करतात. तेथे हा वृक्ष शुभ शकुनाचा प्रतीक मानला जातो.

 मुंबईत कुलाबा, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, वांद्रे, सांताक्रूझ, मुलुंड, भांडुप, पोद्दार रुग्णालय, दादर अशा अनेक ठिकाणी गोरखचिंचेची झाडं आहेत. अंधेरीला (पूर्व) सिप्झच्या तळय़ाच्या परिसरात टाटा सॉफ्टवेअर इमारतीसमोर गोरखचिंच वृक्षांचा मोठा समुदाय पाहायला मिळतो. अतिशय बहुपयोगी असलेली ही गोरखचिंच म्हणजे मुंबई शहराचा महत्त्वाचा वारसा आहे

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0