‘माणूस’ म्हणून तेंडुलकर
फक्त पंचवीसेक वर्षाच्या मैत्रीच्या कालावधीत तेंडुलकर आणि आपल्यात काय घडलं याचं त्यांनी विवेचन केलं आहे. म्हणजेच त्यांनी त्या दोघांदरम्यान घडलेल्या घटनांची फक्त माहिती दिली आहे. मात्र ही माहिती पदरची अनावश्यक भर न घालता दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगात तेंडुलकर माणूस म्हणून कसे वागले किंवा ते माणूस म्हणून कसे होते, याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.
विजय तेंडुलकरांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा होता आणि अजूनही आहे की, त्यांच्याबद्दल मोकळेपणी लिहायला-बोलायला कुणी तयारच होत नाही. या पार्श्वभूमीवर फिरोझ रानडे यांचं अलिकडेच प्रकाशित झालेलं ‘विजय तेंडुलकर: एक इंटरेस्टिंग माणूस’ हे पुस्तक पुरेसं मार्मिक आहे. या पुस्तकात तेंडुलकरांना कमी लेखण्याचा किंवा त्यांचे दोष दाखवण्याचा प्रयत्न फिरोझ रानडे यांनी बिल्कुल केलेला नाही. फक्त पंचवीसेक वर्षाच्या मैत्रीच्या कालावधीत तेंडुलकर आणि आपल्यात काय घडलं याचं त्यांनी विवेचन केलं आहे. म्हणजेच त्यांनी त्या दोघांदरम्यान घडलेल्या घटनांची फक्त माहिती दिली आहे. मात्र ही माहिती पदरची अनावश्यक भर न घालता दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगात तेंडुलकर माणूस म्हणून कसे वागले किंवा ते माणूस म्हणून कसे होते, याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.फिरोज रानडे आणि विजय तेंडुलकर, दोघेही समकालीन; तसंच दोघांचा पेशा मूलत: वेगळा. तेंडुलकर सर्जनशील लेखक-नाटककार, तर रानडे नावाजलेले स्थापत्यज्ञ. त्यामुळेच तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा त्यांच्या कर्तबगारीचा कुठलाही दबाव रानडे यांच्यावर नव्हता. यामुळेच हे पुस्तक म्हणजे ‘सहज घडलं तसं’ अशा पद्धतीचं आहे. परंतु या छोटेखानी पुस्तकात दिलेल्या घटनाच अशा बोलक्या आहेत की, त्यातून तेंडुलकरांचे स्वभावविशेष नकळत डोकावत राहातात आणि ते माणूस म्हणून कसे होते, तेही कळत जातात. पुस्तकातली ही दोन उदाहरणंच बघा-- काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या गुरू दत्त या प्रसिद्ध दिग्दर्शकावर त्या आठवडय़ाच्या एका रविवार पुरवणीत एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा उल्लेख करून मी तेंडुलकरांना काही सांगायला सुरुवात केली, पण त्यांच्या चेह-यावर कौतुकाचे भाव दिसले नाहीत. नंतर ते शांतपणे म्हणाले,‘गुरू दत्तचे उगाचंच कौतुक केले जातेय. मेल्या म्हशीला मणभर दूध.. आणि बोलायचे थांबले.’
- एक सज्जन आणि लोकांना मदत करणारा माणूस म्हणून जयवंत दळवींचा तेंडुलकर खास उल्लेख करत असत. दळवींनी अमेरिकन इन्फर्मेशन सेंटरमध्ये आपल्यासकट इतरांना कामे कशी मिळवून दिली, हेही सांगत. परंतु हे सगळे जरी तेंडुलकरांनी सांगितले असले, तरी दळवींच्या नाटकांबद्दल मात्र ते कधीही काही बोलले नव्हते. ना काही टीकाटिप्पणी केली होती. ना कधी कौतुकाचा एखादा शब्द काढला होता. तसे होणे साहजिकच होते. नाटक लिहिण्यामागच्या दोघांच्या ऊर्जाच वेगळ्या नव्हत्या का?
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा