पहिले पान | कोलाज

कोलाज

image

अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि एकांडे शिलेदार

05 February, 2012 05:30:00 AM
अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपचा मुद्दा गेल्या दोन आठवडय़ापासून सलमान रश्दी आणि अमोल पालेकर यांच्यामुळे चर्चेत आहे. साहित्य, चित्रकला आणि नाटक-सिनेमा यांच्या निमित्तानं अधूनमधून सेन्सॉरशिप, सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य याविषयी उलटसुलट चर्चा होत असते. या चर्चेत बऱ्याचदा सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. कारण तसं केल्यानं आपल्या अपयशाबद्दल सरकारवर ठपका ठेवता येतो. शिवाय आपली जबाबदारी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्याकडून असलेल्या अपेक्षा निभावता आल्या नाहीत तरी चालतं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते केवळ कलावादी भूमिकेतून समाजाकडे पाहतात, माध्यमांसाठी हे लोक सेलिब्रिटी असल्याने त्यांना वारेमाप प्रसिद्धीही मिळते. त्यामुळे मूळ प्रश्न काय आहे हे समजून न घेताच त्यावर गदारोळ माजत राहतो. आपल्याला जसं स्वातंत्र्य हवं असतं तसंच समाजातल्या इतर घटकांनाही हवं असतं, याचा विचार कलावादी मंडळी करत नाहीत. त्यामुळे गुंता वाढतच राहतो. तेव्हा मूळ प्रश्न काय आहे, तो कसा समजून घेतला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला हवं या आणि इतर काही मुद्दय़ांची चर्चा करणारे हे काही लेख. पान दोनवर नाटय़-चित्र अभिनेते निळू फुले आणि आणि पान तीनवर विचारवंत नरहर कुरंदकर यांचे लेख या विषयाची व्याप्ती समजून घेण्यास मदत करतील.
image

रोगापेक्षा इलाज भयंकर?

05 February, 2012 05:30:00 AM महाराष्ट्रातल्या मराठी नाटकाची परंपरा खूपच समृद्ध आहे. मराठी मातीत नाटक जेवढं रुजलं आहे, तेवढं ते इतर राज्यात रुजलं नाही. पालेकर यांनी त्यांना ‘धंदेवाईक’ म्हणून हिणवलं असलं तरी, हिंदी वगळता मराठीएवढी कार्यरत रंगभूमी दुस-या कुठल्याच राज्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या राज्यांत नाटकांच्या सेन्सॉरशिपकडे आजवर कधीच गांभीर्यानं बघितलं गेलेलं नाही. या तुलनेत महाराष्ट्रात नाटकांची लोकप्रियता आणि प्रभाव खूपच मोठा आहे. आणि जेवढा प्रभाव जास्त तेवढी संवेदनशीलता जास्त. त्यामुळे एखाद्या नाटकातली मतं न पटणं, त्यात नकारात्मक संदेश असल्यासारखं वाटणं किंवा कुणाच्या भावना दुखावल्या जाणं हीदेखील स्वाभाविक गोष्ट आहे. नाटकांना सेन्सॉरशिप लावताना सरकारनं या संवेदनशीलतेचा विचार केला तर ते फारसं अयोग्य म्हणता येणार नाही....
आणखी वाचा

मराठी रंगभूमीसंबंधी सेन्सॉरची भूमिका

05 February, 2012 05:30:00 AM सेन्सॉर बोर्डाविषयीचा वाद फार जुना आहे. 1986 साली इचलकरंजीला झालेल्या 67 व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनातही नाटय़-चित्र अभिनेते निळू फुले यांनी सेन्सॉर बोर्डावर अशीच तोफ डागली होती. शिवाय त्यातले धोके स्पष्ट करताना एकंदर समाजाकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. तो लेख आजही मननीय वाटेल, म्हणून त्याचं हे पुर्नप्रकाशन.....
आणखी वाचा

स्वातंत्र्याविषयी बोलायला आपण फारसे हक्कदार नाही!

05 February, 2012 05:30:00 AM अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिप यांच्या सध्याच्या वादात ‘स्वातंत्र्य’ म्हणजे नेमके काय हे, सांगणारा हा लेख अधिक उचित ठरावा. प्रस्तुत लेख ज्यांना पुरेशा गांभीर्याने विचारवंत हे विशेषण लावता येईल अशा नरहर कुरुंदकरांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लिहिला असल्याने त्यात फक्त साहित्यिकांचा उल्लेख आहे. पण कुरुंदकरांना एकूण स्वातंत्र्याकडे कसे पाहावे हे सांगायचे असल्याने ‘आम्हाला स्वातंत्र्य हवे, स्वायत्ता हवी’ असे म्हणणाऱ्या सर्वासाठी हा लेख आहे. त्यात साहित्यिक, चित्रकार आणि कलावंतांचा प्राधान्याने समावेश होतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे. दुसरे असे की, दहा फेब्रुवारी रोजी नरहर कुरंदकर यांचा तिसावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरणही करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याविषयी बोलायला आपण फारसे हक्कदार नाही!...
आणखी वाचा

त्यांचं तिकीट, आपली लॉटरी!

05 February, 2012 05:30:00 AM मोरूला पहिल्यांदा दिसलं तेव्हा त्याला आधी वाटलं की चुकून आपण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराबाहेरच्या रांगेसमोर आहोत की काय? तिथे सगळे ‘मला नोकरी, मला छोकरी, मला टोकरी, मला पैसा, मला यश, मला प्रेम, मला सुख, मला गाडी, मला बंगला’ म्हणून मनोमन आक्रंदत असतात....
आणखी वाचा
image

नो केस इज गॉन केस

05 February, 2012 05:30:00 AM ‘मी कधीच लीडर नव्हते. आय वॉज ऑलवेज फॉलोअर. पण लीडरशिप माझ्यावर येऊन पडली.’ असं मुक्ता पुणतांबेकर म्हणतात. पण अवचित आलेली ही लीडरशिप त्या उत्तम समर्थपणे सांभाळत आहेत. दोन वर्षापूर्वी ‘मुक्तांगण’ला पंचवीस र्वष पूर्ण झाली. आतापर्यंत वीस हजारांच्या आसपास पेशंटवर उपचार करणा-या ‘मुक्तागंण’च्या संचालक या महिन्याच्या ‘झपाटलेपण ते जाणतेपण’च्या लेखिका आहेत. - लेखमालिकेतला पहिला भाग. ...
आणखी वाचा

हृदयी वसंत फुलताना..

05 February, 2012 05:30:00 AM प्रेम ही एक अफाट शक्ती आहे. प्रेमाच्या धाग्यानं माणसातील माणूसपण टिकून राहू शकतं आणि पर्यायानं अखिल विश्वात शांती नांदू शकते. पण या प्रेमाचं जेव्हा तीव्र अट्टहासात रूपांतर होतं, तेव्हा मात्र त्यातून विकृत व्हिसा जन्म घेऊ शकते. जी नातेसंबंधांना मारक ठरू शकते. हृदयी वसंत केव्हा, कुठे, कसा फुलेल याचा काही नेम नाही. परंतु तो फुलत असताना त्याला अनुरूप भावना, विचार व वर्तणूक यांची सांगड घातली गेली तर प्रेमाची अनुभूती ही आपलं जीवन समृद्ध करेल यात शंका नाही. ...
आणखी वाचा

माणसापेक्षा कुत्रा झालो असतो..!

05 February, 2012 05:30:00 AM साला कुत्र्याला कुलर आहे. आपल्या झोपडीत साधा फॅन. तोही आऊटडेटेड झालेला. कटकट वाजत राहतो. या कुत्र्याची सोयसाय बघतली की वाटतं, माणसापेक्षा कुत्रा झालो असतो तर बरं झालं असतं. निदान संसाराच्या कटकटी तरी मागे लागल्या नसत्या. गळा घोटुन जगावं लागलं नसतं. रोजी रोटीच्या सवालानं सतावलं नसतं.....
आणखी वाचा

इंग्रजीतून शिक्षण आणि प्रगती

05 February, 2012 05:30:00 AM मूल लहानपणीच जर एकापेक्षा अधिक भाषा शिकलं तर त्याचा मेंदू अधिक विकसित होतो. आजूबाजूला बोलली जाणारी भाषा मुलं आपोआप आत्मसात करतात. त्यासाठी कोणतेही विशिष्ट प्रयत्न करावे लागत नाहीत. दैनंदिन जगण्यातील असंख्य घटनांमध्ये वापरली न जाणारी भाषा मुलांना ‘आपोआप’, नैसर्गिकरित्या प्राप्त होत नाही. त्यामुळेच ती त्यांना मातृभाषेसारखी सहजतेनं वापरताही येत नाही....
आणखी वाचा
image

पुन्हा राग मानायचा!

05 February, 2012 05:30:00 AM ‘झुळूक अमेरिकन तोऱ्याची’ आणि ‘फिरंग ढंग’या पुस्तकांचे लेखक शरद वर्दे यांचं हे खुसखुशीत शैलीतलं नवंकोरं साप्ताहिक सदर....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 1968 | displaying: 1 - 10