05 February, 2012 05:30:00 AM
मूल लहानपणीच जर एकापेक्षा अधिक भाषा शिकलं तर त्याचा मेंदू अधिक विकसित होतो. आजूबाजूला बोलली जाणारी भाषा मुलं आपोआप आत्मसात करतात. त्यासाठी कोणतेही विशिष्ट प्रयत्न करावे लागत नाहीत. दैनंदिन जगण्यातील असंख्य घटनांमध्ये वापरली न जाणारी भाषा मुलांना ‘आपोआप’, नैसर्गिकरित्या प्राप्त होत नाही. त्यामुळेच ती त्यांना मातृभाषेसारखी सहजतेनं वापरताही येत नाही.
05 February, 2012 05:30:00 AM
‘झुळूक अमेरिकन तोऱ्याची’ आणि ‘फिरंग ढंग’या पुस्तकांचे लेखक शरद वर्दे यांचं हे खुसखुशीत शैलीतलं नवंकोरं साप्ताहिक सदर....
05 February, 2012 05:30:00 AM
प्रस्तुत पुस्तक लिहून मात्र टिकेकरांनी मराठी वाचकांना ऋणको करून ठेवले आहे. कारण ज्यांना आपली वैचारिक प्रगती करून घ्यायची आहे, किमान काय वाचावे, कसे वाचावे याचा साक्षेप कमवायचा आहे, त्यांच्यासाठी टिकेकरांचे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. तेव्हा या गुरूचा ‘गंडाबंद शिष्य’ होणे अनिवार्य आहे!...
05 February, 2012 05:30:00 AM
सुमारे सव्वाचारशे वर्षाचा वारसा लाभलेल्या हैद्राबाद शहराच्या बहुपेडी अंतरंगातील काही ज्ञात-अज्ञात पैलू ‘हैदराबादची चित्तरकथा’ या मौज प्रकाशित पुस्तकात धनंजय कुलकर्णी यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा संपादित भाग.....
05 February, 2012 05:30:00 AM
माणसांचा वावर आणि आजूबाजूच्या डोंगरावरच्या शेतांमधून येणारं तुरळक प्रदूषण गृहित धरूनसुद्धा टाओपोचं पाणी आजही ‘प्रिस्टिन’ म्हणावं असंच आहे. टाओपोच्या पाण्याचा ‘रेसिडेन्स टाईम’ (सरोवरात येऊन मिसळणारं पाणी बाहेर पडेस्तोपर्यंतचा काळ) जवळजवळ दहा वर्ष एवढा आहे. म्हणजे आम्ही पोहलो ते पाणी अजून तिथंच असण्याची शक्यता आहे! पुढे सरोवरातलं पाणी ‘वायकाटो’ या न्यूझीलंडच्या सगळ्यात लांब असलेल्या नदीच्या रूपात बाहेर येतं....
05 February, 2012 05:30:00 AM
भारताच्या कोणत्याही भागात आता सर्रासपणे पंजाबी, दाक्षिणात्य तसेच चायनीज पदार्थ मिळतात. पण त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरतीच आहे. पुरीभाजीचं मात्र तसं नाही. ती संपूर्ण भारतभर सहजपणे उपलब्ध होते. लग्नसराई असो वा वाढदिवस पुरीभाजीनं आपलं स्थान महाराष्ट्रच नव्हे तर, अख्ख्या देशभर कायम ठेवलं आहे....
29 January, 2012 04:30:00 AM
‘युनिक फीचर्स’ आणि ‘अनुभव’ मासिक आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन www.uniquefeatures.in या वेबसाइटवर 28 जानेवारी 2012 पासून भरवण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी ग्रेस या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संक्षिप्त भाग.....
29 January, 2012 04:30:00 AM
सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला अटकाव करणारा आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त ए. आर. राजीव यांनी काढला आहे (हे ए. आर. राजीव आहेत की ए. आर. ‘रहमान’?). त्यांच्या या फतव्याच्या विरोधात काही धर्मप्रेमी नागरिक आणि उत्सवप्रेमी संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यात ‘थर्ड पार्टी’ म्हणून समस्त ठाणेकरांच्या वतीने न्यायालयाला हे निवेदन.....
29 January, 2012 04:30:00 AM
दरवर्षी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला भारतरत्न आणि पद्म पुरस्कार जाहीर होतात. भारतरत्न पुरस्कारांविषयीचा हा रंजक लेख.....
29 January, 2012 04:30:00 AM
मी काही खूप भव्यदिव्य केलं आहे, असं मला बिलकुल वाटत नाही. विद्यार्थिदशेत इंग्रजीवर मात करणं, ही माझी तत्कालीन गरज होती. परिस्थिती माणसाला घडवत असते. तसा मी घडत गेलो. गरज ही शोधाची जननी असते. एक मात्र मी नक्की केलं की मला लागलेला शोध स्वत:पुरता न ठेवता इतरांसोबत वाटत गेलो. ज्ञान वाटल्यानं वाढतं, तसं माझ्याबाबतीतही घडलं. लेखमालिकेतला अखेरचा भाग....