29 January, 2012 04:30:00 AM
एक सर्जनशील कलावंत म्हणून डहाके यांचे नाते अस्तित्ववादी विचारधारेशी असल्याचे दिसते. जीवनसंघर्षात पिचलेल्या, हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसांचे चेहरे त्यांच्या साहित्यातून आणि चित्रांतूनही सतत भेटत राहतात.. चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची एक वेगळी ओळख.
29 January, 2012 04:30:00 AM
इंजिनीअरिंग, मेडिकल आणि व्यवस्थापन क्षेत्रातील महाविद्यालयात मराठीतून अभ्यासक्रम सुरू करण्याची अनिल गोरे यांची इच्छा आहे. घर, कुटुंब, शिकवणीच्या व्यवसायाबरोबरच मराठी भाषेसाठी गोरे यांची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे. गोरे यांच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, ‘मी मराठी, तू मराठी, बोलू मराठी.’...
29 January, 2012 04:30:00 AM
गरीब थरातील पालक आपल्या मुलांना शाळेत घालत नाहीत, याचे कारण त्यांना शिक्षणाचे महत्त्व वाटत नाही, असा वरच्या वर्गात एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात गरीब थरातील पालक आपल्या मुलाच्या शिक्षणावर आपल्या उत्पन्नाच्या 30 टक्के खर्च करतात तर श्रीमंत थरात हा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या जेमतेम सहा ते सात टक्के एवढाच असतो....
29 January, 2012 04:30:00 AM
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक म्हणजे क्रौर्याचाही एक खेळ आहे, हे तर खरंच. पण सारे कौर्य काल्पनिकतेतूनच प्रत्ययाला येत असल्यामुळे ते कुठेही भडक तर होत नाहीच, पण त्यामुळे मुळातला जळफळाटही सौम्य होतो....
29 January, 2012 04:30:00 AM
दोन-तिन दिवस झाले एक दिवस आई लपत लपत बसस्टँडवर आली. मला बघीतले मीही आईकडे बघीतले आई सिधी मह्या गळ्यात येऊन पडली. रडायला लागली, माफी मागायली, पालावर चाल म्हणून आग्रह करायली. तवा मी 12-13 वर्षाचा असेन. आईने मला कडेवर घेतले दोघं मायलेकरं पालावर आलो .....
29 January, 2012 04:30:00 AM
मराठी साहित्याचा मराठी समाजावर पुरेसा प्रभाव दोनशे वर्षामध्येही पडत नाही, त्याचं कारण वैचारिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि पक्क्या-प्रगल्भ धारणांचा अभाव हेच आहे. त्यामुळे काळाच्या हाका सावधपणे ऐकण्याची गरज आहे. ...
29 January, 2012 04:30:00 AM
संस्कृती, सण, भाषा, संगीत व चित्र याला धर्म वा देशाची सीमा थोपवू शकत नाही. तसा प्रयत्न यशस्वी होत नाही. कालगणनेप्रमाणे वसंतपंचमी ही हिंदू पंचांगाप्रमाणे साजरी होते. पण त्यामुळे फरक पडत नाही. दोन-तीन वर्षापूर्वी लाहोरच्या प्रशासनानं पतंग उडवण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी तो उधळून लावला....
29 January, 2012 04:30:00 AM
सुरुवातीच्या काळात या टांकसाळीत उपकरणांच्या मदतीने फारशी नाणी तयार होत नव्हती. नंतर तिच्यात भर आणि सुधारणा केल्यानंतर 1907 मध्ये दिवसाला साडेसात लाख रुपयांची नाणी तयार होऊ लागली. आवश्यकतेप्रमाणे चांदी, तांबे, सोनं आणि निकेलचीही नाणी काढण्यात येऊ लागली. या टांकसाळीतून 1885 ते 1910 दरम्यान सिंगापूर सरकार आणि ब्रिटिशांच्या पूर्व आफ्रिकेच्या मांडलिक देशांसाठीही नाणी घडवण्यात आली. ...
29 January, 2012 04:30:00 AM
या पुस्तकाचा लसाविमसावि समजून घेण्याची गरज आहे. आणि तो आहे पाडगावकरांना माणूस समजून घेण्यात असलेलं अनिवार कुतूहल. इतकी वर्षे सातत्यानं कविता लिहूनही मला माणूस कळला आहे, असं पाडगावकर म्हणत नाहीत, हे फार सूचक आहे....
29 January, 2012 04:30:00 AM
‘बिकमिंग इंडियन’ हा पवन वर्मा यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद आहे. यात इतिहास, प्रचलित घडामोडी आणि व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे भारतीयत्वाची ओळख वर्मा यांनी करून दिली आहे. भाषा, स्थापत्यशास्त्र, कला, वसाहतवादामुळे झालेलं विस्मरण, भारताच्या सांस्कृतिक परंपरांची शक्ती आणि त्यांचा विकास आणि आपल्या संस्कृतीची सध्याची स्थिती यांचाही परामर्श घेतला आहे. अमेय प्रकाशनासाठी भगवान दातार यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. त्यातील वर्मा यांची ही प्रस्तावना. ...