कोलाज
बाओबाब गोरखचिंच
22 August, 2010 04:10:00 AM
महाकाय गोरखचिंच बहुगुणी आणि बहुपयोगी आहे. या वृक्षाचं मूळ भारतात नसलं, तरी अनेक प्राचीन ग्रंथांत या वृक्षाचे संदर्भ सापडतात. महत्त्वाचं म्हणजे या वृक्षाखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केलं, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचं सांगितलं जातं.
श्रावणातली खादाडी
22 August, 2010 05:55:00 AM एकादशी दुप्पट खाशी, असं आपल्याकडे म्हणतात. पण ‘टिपटॉप’ आणि ‘दिवा महाराष्ट्राचा’मधील श्रावण स्पेशल खाणं पाहून खरंच दुप्पट खायची इच्छा होईल. ...दिल्लीचा गेम
22 August, 2010 02:15:00 AM राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा यदाकदाचित यशस्वी झालीच, तर तो एक चमत्कार ठरेल! पण ऐतिहासिक दिल्लीनं असे अनेक ‘गेम’ सोसलेत.....‘माणूस’ म्हणून तेंडुलकर
22 August, 2010 05:25:00 AM फक्त पंचवीसेक वर्षाच्या मैत्रीच्या कालावधीत तेंडुलकर आणि आपल्यात काय घडलं याचं त्यांनी विवेचन केलं आहे. म्हणजेच त्यांनी त्या दोघांदरम्यान घडलेल्या घटनांची फक्त माहिती दिली आहे. मात्र ही माहिती पदरची अनावश्यक भर न घालता दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगात तेंडुलकर माणूस म्हणून कसे वागले किंवा ते माणूस म्हणून कसे होते, याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं. ...डासांच्या सहवासातलं संशोधन
22 August, 2010 03:35:00 AM एक काळ होता, जेव्हा मलेरियाच्या साथीसाठी वाईट हवामानाला जबाबदार धरलं जात होतं. त्या काळात एक डॉक्टर मलेरियाचे वाहक म्हणून डासांना जबाबदार धरत होता. त्यासाठी त्याने अनेक डासांचा पिच्छा पुरवला, त्यांचं विच्छेदन केलं आणि आपलं म्हणणं सिद्ध केलं. तेव्हापासून म्हणजे 1898 पासून 20 ऑगस्ट हा दिवस ‘वर्ल्ड मॉस्क्युटो डे’ म्हणून पाळला जातो. नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड मॉस्क्युटो डे’च्या निमित्ताने, डासांच्या मागे भटकून डॉ. रोनाल्ड रॉस यांनी केलेल्या संशोधनाची आणि त्यांच्या चिकाटीची ही गोष्ट.....बाकी प्रश्न..
15 August, 2010 07:00:00 AM देश स्वतंत्र झाला म्हणजे तो इथल्या सर्व लोकांचा झाला. या स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडताना मात्र काही क्षेत्रांत लोक बाजूलाच पडल्याचं दिसतं. शिक्षण आणि आरोग्य सर्वापर्यंत पोहोचत नाही, तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचे फायदे ‘जनते’पासून दूरच राहतात. राज्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि वैज्ञानिक प्रगतीच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला, पण अजेंडा अधुराच राहिला. प्रसंगी सरकारच्या विरुद्ध जाऊन वेगळी उत्तरं शोधण्याचं काम ज्या लोकचळवळींनी केलं, त्यातून आलेले हे तिघा कार्यकर्त्यांचे खास लेख. अनुभवातून आलेल्या या उत्तरांची चर्चा व्हायलाच हवी!...वाचलेला कवी
15 August, 2010 07:10:00 AM ‘पुस्तकांच्या संग्रहाविषयी’ या कवितेच्या पोस्टरमुळे सतीश काळसेकर अनेकांना माहीत असतील. कवी असणं आणि भरपूर वाचनातून परंपरांबद्दलची निरीक्षणं न्याहाळत पुढे जाणं यात काळसेकर फरक करत नाहीत. परंपरांचं वाचन वर्तमानाशी भिडण्यासाठीच करायचं, या विश्वासातून काळसेकरांनी चळवळ आणि साहित्य यांतही कधी फरक केलेला नाही. मग ती कामगार चळवळ असो, लघुअनियतकालिकांची असो की वाचनचळवळ.. ...अपेक्षा नसलेली नाती
15 August, 2010 08:00:00 AM माझं आणि डहाकेंचं नातं वेगळ्या कॅटॅगरीतलं आहे. त्याचं श्रेय दोघांनाही जातं. अत्यंत विक्षिप्त, आवडीनिवडी तीव्र आणि परफेक्शनिस्ट असलेल्या बाईबरोबर संसार करणं ही कठीण गोष्ट होती, मात्र डहाकेंनी ते करून दाखवलं. नात्यांमध्ये अपेक्षा खूप असतात. त्यात अहंकारही असतो. मी ती भानगडच ठेवलेली नाही. मी याबाबतीत स्वत:ला जिंकलेलं आहे. माझ्या नव-याने घरात काही करावं, पाहावं अशीही अपेक्षा करत नाही. घराची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकलेली नाही. तरीही डहाके काही काही गोष्टी करत असतात... सांगत आहेत कवयित्री प्रभा गणोरकर...सोशल नेटवर्किंगचं समाजकारण!
15 August, 2010 07:15:00 AM कोणत्याही संघटनेचं बॅनर नाही, कोणती पत्रकार परिषद नाही, असं असतानाही अभिलाष कृष्णन, रचना ब्रार आणि जयदेव रुपानी या तिघांनी टॅक्सी व रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात सोशल नेटवर्किंग साईट्सवर वाजवलेला बिगुल लोकांपर्यंत पोहोचला, हे या माध्यमाचं मोठंच यश आहे. यानिमित्ताने आंदोलनाच्या नेटवर्किंगसाठी एक नवंच माध्यम उपलब्ध झालंय....अनमोल ‘रतन’
15 August, 2010 07:30:00 AM जबरदस्त इच्छाशक्ती, तत्त्वांशी प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी या गोष्टींमुळे रतन टाटा यांनी टाटा समूहाला मोठी उंची गाठून दिली. पण जगभर भरारी घेतानाही सर्वसामान्य जनतेशी, समाजाशी असलेली बांधिलकी ते विसरलेले नाहीत. त्यामुळेच 26/11 नंतर 15 दिवसांच्या आत हल्ल्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला आर्थिक मदत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. नॅनोसारखी गाडी जगासमोर आणताना त्यांच्या चेह-यावर मध्यमवर्गीयांसाठी काही तरी केल्याचे समाधान झळकत होते....मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य