06 February, 2012 06:30:00 AM
कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले.
30 January, 2012 06:30:00 AM
निवडणूक आयोगाकडे आचारसंहिताभंगाच्या दररोज शेकडय़ांनी तक्रारी येत असून सध्या सुमारे दीड हजार तक्रारी प्रलंबित आहेत. नीला सत्यनारायण प्रत्येक तक्रारीमध्ये स्वत: लक्ष घालून त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे तक्रारीचा निपटारा करीत असतानाच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचे निकाल एकाच वेळी जाहीर करण्याची होत असलेली मागणी पूर्ण करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे....
23 January, 2012 06:30:00 AM
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना, भाजपशी महायुती करण्याचे कारस्थान हा पवारांच्या कुटील नीतीचाच भाग आहे. पण सिंधुदुर्गातील जनतेचा नारायण राणेंच्या विकासकामांवर आणि सहृदयतेने केलेल्या मदतीवर पूर्ण विश्वास आहे आणि राणेंचाही आपल्या मतदारांवर विश्वास असल्याने महायुतीचा काही परिणाम होऊ शकणार नाही. पण राष्ट्रवादीची अवस्था अशी झाली आहे की, शिकार करताना वाघ मिळाला नाही तर कोल्हा किंवा भित्रा ससा देखील त्यांना चालतो. त्यामुळे राजकारणातील फोडाफोडीचे जनक म्हणून पवारांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदले गेले आहे. ...
16 January, 2012 06:30:00 AM
बसपचे हत्ती झाकले तरी त्यांचा आकार कायम राहिल्याने मायावतींना कदाचित लाभ होईलही, पण शिववडय़ाच्या गाडय़ा झाकल्याने त्यांच्यावर रेखाटलेले निवडणूक चिन्ह आणि बोध चिन्ह खरोखरच झाकले जाईल आणि शिवसेनेला लाभ होणार नाही. हे नितेश राणे यांचे तर्कशास्त्र शिवसेनेला अडचणीत आणणारेच ठरेल. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात आचारसंहिता भंगाच्या भीतीचा गोळा उठला आहे. अशा प्रकारे नितेश राणे यांनी शिवसेनेला पेचात पकडल्याने राजकारणात चांगलीच रंगत आली आहे. चक्रधर स्वामींच्याच भाषेत सांगायचे झाले तर जेणे आचारसंहितेचा धसका घेतिला, त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठिला, असेच म्हणावे लागेल....
09 January, 2012 06:10:00 AM
पंधरा वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता भोगणा-या शिवसेना-भाजप युतीला ही निवडणूक जड जाणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीचा तिढाही अजून सुटलेला नाही. मागच्या वेळीही आघाडी अंतिम टप्प्यात असतानाच केवळ एका जागेचा वाद उकरून काढून राष्ट्रवादीने आघाडीवर पाणी सोडले होते. परिणामी आघाडीला पालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. यावेळी दोन्ही काँग्रेसने समजूतदारपणा दाखविल्यास मुंबई महापालिकेत घोटाळे करणा-या शिवसेना-भाजपचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही....
02 January, 2012 06:30:00 AM
खरे पाहता महागाईला आळा आणि भ्रष्टाचा-यांना तुरुंगात पाठविण्याची उत्तम कामगिरी बजावणा-या काँग्रेस सरकारने अण्णांच्या आंदोलनामागे फरफटत जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे भाजपप्रमाणे काँग्रेसलाही लोकपाल हवा की घाशीराम कोतवाल, अशी शंका येते. एकीकडे कोणत्याही राजकीय पक्षाला लोकपाल नको, असे म्हटले जात आहे. तसे असेल तर संसदेत जनतेचा एवढा पैसा आणि वेळ वाया घालविण्याची गरज काय होती?...
26 December, 2011 07:00:00 AM
विरोधकांची केविलवाणी अवस्था झालेली असताना सरकार मात्र आपले कामकाज बिनधास्तपणे पूर्ण करीत होते. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत विरोधक पुन्हा शेतक-यांचा विषय उपस्थित करतील म्हणून कधी नव्हे ते सरकारने दोन हजार कोटींचे पॅकेज कोणतीही आपत्ती नसताना शेतक-यांसाठी घोषित केले. इंदू मिल आणि बेळगावच्या प्रश्नावर राजकारण करू पाहणा-या विरोधकांच्या हातातील कोलीतही त्या विषयावरचे ठराव सभागृहात संमत करून सरकारने काढून घेतले....
12 December, 2011 06:30:00 AM
पेराल तसे उगवेल, या म्हणीनुसार, मुंबईला मातोश्रीवर जे पेरले ते पुण्यात उगवले. मागील वेळी राष्ट्रवादी तसेच शिवसेना-भाजप अशी सत्ता पुणे महानगरपालिकेत होती. या अभद्र युतीला पुणे पॅटर्न असे संबोधले जाऊ लागले. या पॅटर्नची रोपटी यंदा महाराष्ट्रात सर्वत्र वाढू लागली आहेत....
05 December, 2011 06:30:00 AM
कोलंबिया विद्यापीठात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथदालनात आजही प्रथम क्रमांकाचे स्कॉलर म्हणून बराक ओबामा त्यांची आणखी एक प्रतिमा लावून त्यांचा गौरव करतात आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय स्मारक तर नाहीच पण त्यांची जयंती, पुण्यतिथी दलित समाजच करतो. आता तरी सरकारला जाग येईल आणि महाराष्ट्रात बाबासाहेबांचे भव्य राष्ट्रीय स्मारक होईल अशी अपेक्षा आहे....
28 November, 2011 06:30:00 AM
राजकीय नेते असो अथवा प्रशासकीय अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेना आणि मनसेनेचे कार्यकर्ते जर त्यांच्या तोंडाला डांबर फासून त्यांच्यावर हल्ले करीत असतील तर त्यांच्या या झुंडशाहीलाही आळा घालावा लागेल. शरद पवारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे पुढे सरसावले ही चांगली गोष्ट आहे परंतु नेत्यांना मारणे जसे निषेधार्ह आहे तसेच अधिका-यांना मारणेही अयोग्य आहे....