26 March, 2010 06:55:00 AM
इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केवळ पैशांची उपलब्धता असून भागणार नाही. करायची कामे वेळेनुसार सुरू व्हायला हवीत व वेळेनुसार पुरी व्हायला हवी. याबाबतीत आपल्याकडे अत्यंत निराशाजनक इतिहास आहे. ज्या प्रकल्पाना भूमिसंपादनाची आवश्यकता आहे, तिथे भूधारकांचा विरोध आहे. भरीला पर्यावरणवादी आहेतच. जिथे एकरी पाच-दहा हजाराचे उत्पन्न येत नाही, ती जमीन देताना शेतकरी वा मालक लक्षावधी रुपये मागत आहेत. जमिनीतल्या निघणा-या नक्त उत्पन्नाइतके व्याज मिळेल, इतकी रक्कम वा त्यापेक्षा थोडी जास्त रक्कम दिली जाईल, असा दंडक घालायला हवा आहे. तसे झाले तर फार कमी रक्कम द्यायला लागेल. मात्र त्यासाठी विनाविलंब कारवाई हवी आहे.
19 March, 2010 06:55:00 AM
बँकांची सर्व शक्ती बँकिंग क्षेत्रातच एकवटली पाहिजे, अशा उद्देशाने केंद्र शासन बँकांनी अन्य आनुषंगिक व्यवहारातून हळुहळू अंग काढून घ्यावे, असा फतवा आज ना उद्या केंद्र शासन काढील, असे बोलले जात आहे. या व्यवहारांत महत्त्वाचा व्यवहार आयुर्विम्याचा आहे व सर्वसाधारण विम्याचाही आहे. ...
12 March, 2010 06:30:00 AM
अकराव्या पंचवार्षिक योजनेत सहापदरी 6,500 किलोमीटर्स, सुवर्णचतुष्कोणात हवे आहेत. चौपदरी 6736 किलोमीटर्स अपेक्षित आहेत. दाक्षिणोत्तर व पूर्व-पश्चिम एक्स्प्रेस वेमध्ये तर 20,000 किलोमीटर्स चौपदरी करण्याचे व 20,000 किलोमीटर्स दुपदरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेची आता फक्त दोन वर्षे शिल्लक असल्याने महामार्गावरून मोठी रक्कम घालायला हवी आहे. ऊर्जेतल्या 78577 मेगॅवॉट नव्या निर्मितीचे उद्दिष्ट आता दोन वर्षात पुरे होणारे नाही. दूरध्वनी विभागाची 60 कोटी ग्राहक करण्याची योजना बरीचशी खासगी कंपन्यांद्वारे पुरी केली जावी....
05 March, 2010 06:50:00 AM
पेट्रोल व डिझेलबाबतच्या पारीख अहवालापूर्वीही या क्षेत्रातील संलग्न असलेले अनेक प्रश्न ग्राहकांना आहेत. पेट्रोलचे उत्पादन भारतात बॉम्बे हाय व गुजरात व आसाममध्येच होते. राजस्थानमध्ये नुकतेच केर्न इंडिया वगैरे कंपन्यांना पेट्रोल मिळाले आहे आणि कृष्णा-गोदावरी खो-यात रिलायन्सला आता नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात व पेट्रोल काही प्रमाणात मिळाले असले तरी भारतात पेट्रोलबाबत हिरिरीने प्रयत्न झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ...
26 February, 2010 06:30:00 AM
संख्याशास्त्रात नजरफेकीला खूप महत्त्व असते. दोन संख्यांची तुलना करताना एखादा आकडा लहान वा मोठा केला की परिणाम एकदम वेगळा होतो. उदा. गेल्या वर्षी मांडलेल्या 2009-10च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 6.8 टक्के दाखवली होती. वित्तीय तूट 400,996 कोटी होती. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न 58,97000 कोटी रुपये दिसते. हा आकडा भाषणात वा अन्यत्र आलेला नाही.2009-10 साली अर्थव्यवस्था 7.2 टक्क्याने किमान वाढेल, असा सध्याचा अंदाज आहे. ती टक्केवारी 7.5 टक्केही नंतर येऊ शकेल.
...
19 February, 2010 06:45:00 AM
१९९१ मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि चित्र बदलले. त्याच्या आधी काही महिने किरकोळ परदेशी देणी देण्यासाठी आपल्याला सोने गहाण ठेवावे लागले होते. आपली विदेशमुद्रा त्या वेळी फक्त एक अब्ज डॉलर होती. त्यानंतर मक्तेदारी व भांडवल नियंत्रण कायदा रद्द झाला. परदेशी चलन इथे येऊ लागले. अनिवासी भारतीयांनी, १९९८मध्ये भारतावर तंत्रज्ञानाप्रमाणेच आर्थिक अंकुश आणले तेव्हा प्रचंड प्रमाणात डॉलर्सचा पुरवठा केला व अमेरिकेची नाचक्की केली. आजची अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर भारतात विदेशी चलन पाठवले जाते....
12 February, 2010 06:30:00 AM
किरीट पारीख समितीच्या अहवालानुसार, सध्या पेट्रोलची किंमत लिटरला सहा रुपयांने वाढवावी लागेल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून विकल्या जाणा-या रॉकेलचा दर लिटरला सहा रुपयांने वाढवायची जरुरी पडेल. गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी वर जाईल. त्यामुळे महागाईत वाढ होईल, हे स्वाभाविक आहे. डिझेल गाडय़ांच्या खरेदीवर एकरकमी 80,000 रुपयांचा कर लावायची शिफारस आहे. त्याखेरीज, जागतिक बाजारात सध्या असलेली एका बॅरलला 80 डॉलर असलेली किंमत जर पुन: 150 डॉलपर्यंत गेली तर सध्या पेट्रोलला लिटरला 55 रुपये द्यावे लागतात, ती किंमत लिटरला 80 रुपयांवर जाईल....
05 February, 2010 06:30:00 AM
रिझव्र्ह बँकेच्या मौद्रिक धोरणामुळे महागाईवाढीवरही काही परिणाम होत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. सध्याची महागाई ही वस्तूंचा पुरवठा कमी असल्याने व राजकीय नेत्यांमुळे होत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस पडला तेव्हा रब्बीचे पीक उत्तम येईल, असे सांगितले गेले आहे. पण त्यामुळे पिकणारा गहू ग्राहकांच्या तोंडात रास्त दराने पडणार आहे का, याचे उत्तर नकारार्थी आहे....
29 January, 2010 06:30:00 AM
लालूप्रसाद यादव यांच्या कारकीर्दीत डब्यांची संख्या वाढवल्यामुळे व दर डब्यातली प्रवासी जागा दीडपट केल्यामुळेच उत्पन्नात वाढ दिसली तरी त्याचा अप्रत्यक्ष ताण रेल्वे रूळ, प्लॅटफॉर्म या सर्वावर झाला. तिथली गैरसोय व घसारा यांचा विचार करता, ती प्रगती भविष्यकाळात महाग ठरणारी आहे. आजही रेल्वेचे कित्येक डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर, खडबडीत जागा असलेल्या ठिकाणी उभे राहिल्याने उडय़ा मारून प्रवाशांना बाहेर यावे लागते. रेल्वेचे डबे 12 वरून 24 पर्यंत गेले तरी प्लॅटफॉर्मवर खाण्यापिण्याचे स्टॉल्स, वृत्तपत्रे यांच्या सुविधा वाढलेल्या नाहीत. वृद्ध व स्त्रिया, मुले यांना बसण्यासाठी बाक नसतात. पाण्याचे नळ कुठेतरी लांब राहतात. त्यामुळे होणारी प्रवाशांची ससेहोलपट लक्षात घेतली गेलेली नाही....
22 January, 2010 06:50:00 AM
येत्या फेब्रुवारीच्या २६ तारखेला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आपला २०१० -११ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेला सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे; कारण अनेक महत्त्वाच्या व तात्त्विक मुद्यांचा त्यात खुलासा अपेक्षित आहे. ...