11 February, 2012 06:30:00 AM
रेल्वे व मालट्रक यांच्यामध्ये स्पर्धेपेक्षा समन्वय साधल्यास बऱ्याच प्रमाणात इंधनाची बचत होऊ शकते. त्या अनुषंगाने भरलेली मालट्रकच रेल्वेच्या उघडय़ा मालडब्यावर (बीएफआर) चढवून कोकण रेल्वेवर ट्रकची वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर चालू केली होती. पण त्या योजनेला ट्रक मालक-चालकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळू शकला नाही.
10 February, 2012 06:45:00 AM
जागतिक अर्थकारणात तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता म्हणून भारत उदयास येत असला तरी अभ्यासकांच्या मते उपखंडातील त्याच्या राजकीय प्रभावाला गेल्या काही दशकात ओहोटीच लागली असल्याचे दिसून येते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरुद मिरवणाऱ्या भारताला मालदीवसारख्या चिमुकल्या देशावर प्रभाव राखता येऊ नये हे त्याचे उदाहरण....
09 February, 2012 05:55:00 AM
पवारांच्या आधी शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या नेमस्त स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यानेही आणीबाणीच्या काळात अंतर्बाह्य सज्जन म्हणून ओळखले जाणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्र्यंबक सीताराम कारखानीस यांना काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले होते. याच्याही आधी यशवंतराव चव्हाण यांनी यशवंतराव मोहिते यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवून तर शंकरराव मोहिते यांना त्यांचा साखर कारखाना मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचा शब्द देऊन काँग्रेसमध्ये आणले होते....
07 February, 2012 06:25:00 AM
एका पाहणीनुसार 1951-52मध्ये शेतमालाच्या खरेदीवर ग्राहकांकडून खर्च केल्या जाणा-या रकमेतली 89 टक्के रक्कम शेतक-यांच्या हातात पडत होती. सध्या ते प्रमाण 34 टक्क्यांवर आले आहे. शेतक-यांकडून तीन ते चार रुपये किलोने घेतला जाणारा कांदा मुंबई-पुण्यात 11 ते 12 रुपये किलोने विकला जातो. म्हणजेच प्रत्येक किलोतले आठ रुपये मधल्या दलालांकडे जातात. हे दलाल नाहीसे केले तर त्या आठ रुपयातले चार रुपये शेतक-यांना आणि चार रुपये सामान्य ग्राहकाला मिळू शकतील....
06 February, 2012 05:30:00 AM
काल 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली, तर उद्या चार्ल्स डिकन्स या इंग्रजीतील अभिजात कादंबरीकाराच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. ...
04 February, 2012 06:45:00 AM
व्यापारासाठीचे मोक्याचे स्थान, ब्रिटिशांनी उभारलेले पायाभूत सुविधांचे इन्फ्रास्ट्रक्चर, देशभराशी संपर्काचे जाळे आणि पूर्वापारपासूनची ख्याती या गुणांच्या बळावर मुंबई हालती-बोलती-चालती आणि व्यापार करती राहीलही- पण ‘स्वप्नांचे शहर’ हा तिचा लौकिक शिल्लक उरणार आहे का?
...
03 February, 2012 06:00:00 AM
पुरोगामी समजला जाणारा महाराष्ट्र अगदी मध्य प्रदेशाबरोबर नसला तरी त्याची कामगिरी फारशी स्पृहणीय नाही. अजूनही हजारामागे 28 बालमृत्यू होतात. प्रत्यक्षात हे प्रमाण अधिकही असू शकते. मेळघाट(अमरावती), गडचिरोली आणि ठाण्यातील मोखाडा येथे गेल्या दोन दशकात कुपोषणाने मोठ्या प्रमाणावर कोवळी पानगळ झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्याच वर्षी राज्य कुपोषणमुक्त करण्याचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. परंतु त्यांच्या घोषणेनंतर भरीव असे काही झाल्याचे ऐकिवात नाही....
02 February, 2012 06:30:00 AM
शरद पवारांनी आपले मंत्रिमंडळ पाडले यात वसंतदादांना फारसे गैर वाटले नव्हते; पण मी स्वत: सरकारचा राजीनामा देत असताना त्यांनी मला तो देऊ दिला नाही आणि नंतर माझे सरकार पाडून स्वत:चे सरकार स्थापन केले. हा माझा विश्वासघात होता, ही खंत दादांना पुढे अनेक वर्षे सलत राहिली; पण हा भाग मुलाखतीत कुठे आलाच नाही. त्यामुळे एकूणच पवार ऐकायला छान-छान पण त्यांची विश्वासार्हता न बोलण्याजोगीच. यापेक्षा दुसरे काय बोलावे?...
31 January, 2012 06:50:00 AM
नुकसान झाले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र त्या अधिकाराचा वापर करताना संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्याची सरकारची जबाबदारी आहे. ती अँट्रिक्स-देवास प्रकरणात पाळली गेली नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आणि देशाची निष्ठापूर्वक सेवा करणा-या संशोधकांना काळ्या यादीत टाकल्याने सरकारचीच नाचक्की झाली आहे....
28 January, 2012 06:30:00 AM
खरेतर धार्मिक कर्मकांडांनी पछाडलेल्या कोणत्याही देशात ख-या अर्थाने अल्पसंख्य असतात ते धर्मप्रामाण्य नाकारणारे विवेकवादी. माणसाचा सगळा विकास चिकित्सेतून झाला आहे त्यामुळे चिकित्साच नाकारणा-या श्रद्धेचे प्रामाण्य स्वीकारणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. तिचा भावनिक अवगाहन आणि शाब्दिक मायाजालापलीकडे कोणत्याही मार्गाने बौद्धिक प्रतिवाद करता येत नाही म्हटल्यावर धर्मवादी बहुसंख्याक- धर्म भ्रष्ट किंवा नष्ट होण्याच्या चिरस्थायी भीतीतून- विवेकवाद्यांवर शक्य त्या सर्व वैध-अवैध, प्रसंगी हिंसक मार्गानी हल्ले चढवत असतात....