31 July, 2009 08:20:00 AM
फॅशन आयकॉन, जगातील सौंदर्यवतींपैकी एक, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कट्टर विरोधक, लोकसभेची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकणा-या खासदार, मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणा-या समाजसुधारक अशा विविध भूमिका एकाच आयुष्यात जगलेल्या महाराणी गायत्रीदेवी काल या जगातून निघून गेल्या.
30 July, 2009 08:05:00 AM
तूरडाळीच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. साखर, तांदूळ, दूध, भाज्या यांच्याही दरांत प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे लोकांची क्रयशक्ती आधीच कमकुवत झाली आहे. त्यात शासकीय कर्मचारी वगळता सर्वच क्षेत्रात कामगारकपात किंवा वेतनकपातीचे धोरण कठोरपणे राबविले जाते आहे. ...
28 July, 2009 10:16:00 PM
मुखपृष्ठ, कागद, आकर्षक मांडणी, रंगांचा वापर आदी ‘मेकअप’पेक्षा कसदार, टिकाऊ, उपयुक्त अक्षरसंपदा असलेले साहित्य अधिक महत्त्वाचे, असे मानणारे प्रकाशक गेल्या चार दशकांत कमी-कमी होत गेले. व्यवसायिकतेपेक्षाही धंदेवाईक बनत चाललेल्या प्रकाशनाच्या क्षेत्रात, याच काळात अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आपल्या निष्ठा मात्र बदलल्या नाहीत. ...
27 July, 2009 09:50:00 PM
गेल्या आठवडय़ात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममतांनी जमीन सुधारणा विधेयकाला टोकाचा विरोध करताना सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. हे त्यांच्या आक्रस्ताळी प्रतिमेला साजेसे असले, तरी एका जबाबदार मंत्र्याचे वर्तन म्हणून ते निश्चितच शोभणारे नव्हते. ...
27 July, 2009 07:30:00 AM
संगीताचे स्वर सातच; मात्र रसिकांच्या हृदयाला हात घालण्याची त्यांची ताकद जोखून त्यांना हवे तसे वळण देण्याची अजब किमया साधलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणा-या संगीतकारांपैकी एक म्हणून भास्कर चंदावरकर यांचे नाव घ्यावे लागेल....
24 July, 2009 09:36:00 PM
गेल्या वर्षीचे प्रलंबित आणि यंदाच्या वर्षीचे अपेक्षित शिवछत्रपती पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर झाले. पण केवळ राज्य सरकारच्या वेबसाइटवर याची घोषणा करणा-या क्रीडा खात्याने पुरस्कार प्रदान केव्हा करणार, याविषयी भाष्य केलेले नाही. ...
24 July, 2009 08:20:00 AM
नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व आन्ध्र प्रदेश या राज्यांना बसला आहे. त्यातील महाराष्ट्र आणि आन्ध्र प्रदेशचा अपवाद वगळल्यास अन्य सर्व राज्यांत गेली किमान १० वर्षे बिगर-काँग्रेस पक्षांचे राज्य होते. त्यातही स्वत:ला शेतकरी-कामगारांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता पश्चिम बंगालमध्ये गेली सलग ३० वर्षे आहे....
23 July, 2009 09:20:00 AM
विठूरायाच्या चरणावर माथा टेकवून मनाची शांती मिळविणा-या वारक-यांना आता असे करता येणार नाही की त्याची महापूजाही करता येणार नाही.
...
21 July, 2009 09:01:00 PM
माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या परराष्ट्र धोरणाला विरोध करून सत्तेवर आलेल्या ओबामा यांचे सरकार भारताबाबत किती अनुकूल भूमिका घेते, याकडे भारतातील राजकीय तज्ज्ञांचे तसेच नेत्यांचेही लक्ष लागले होते. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तानातून पोसल्या जाणा-या दहशतवादाचा होता. यासंदर्भात हिलरी क्लिंटन यांनी आपल्या दौ-यात भारताला अनुकूल अशी भूमिका घेतली आहे....
21 July, 2009 08:00:00 AM
आजच्या रा. चिं. ढेरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधूनच ‘करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीसंदर्भात उपलब्ध असलेल्या सा-या अभ्यास साधनांचा धांडोळा घेऊन शरीर साथ देत नसतानाही गेली अडीच-तीन वर्ष हा ग्रंथ लिहिण्यात ते व्यग्र होते. ...